Satara Latest Marathi News 
सातारा

सातारा जिल्ह्यातील रस्त्यांसाठी केंद्राचा निधी द्या; खासदार उदयनराजेंची मंत्री गडकरींकडे मागणी

उमेश बांबरे

सातारा : केंद्र सरकारच्या सेन्ट्रल रोड फंड योजनेतून जिल्ह्यातील विविध मार्गांची कामे मार्गी लावावीत, अशी विनंती खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भेटीअंती केली. या वेळी मागणीनुसार जिल्ह्यास जास्तीत जास्त निधी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देण्याचे आश्‍वासन श्री. गडकरी यांनी उदयनराजे यांना दिले. 

पाटण, जावळी, महाबळेश्‍वर, कऱ्हाड शहर, कऱ्हाड तालुका, कोरेगाव, रहिमतपूर, पाचगणी, पुसेगाव, वडूज, कातरखटाव, पाचवड फाटा परिसरातून जाणाऱ्या प्राथमिक आणि राज्यमार्गांची दुरवस्था झाली असून, त्यांचे रुंदीकरण तसेच सुधारणा आवश्‍यक आहे. या मार्गांवरील शहरांना रुंदीकरणाचा फटका बसू नये, यासाठी अनेक ठिकाणी रिंगरोड करणे आवश्‍यक आहे. या मार्गांची माहिती संकलित करत त्यासाठीचा निधी केंद्र शासनाकडून मिळावा, यासाठीचे निवेदन खासदार उदयनराजे यांनी नुकतेच दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री गडकरी यांना दिले. 

जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी यापूर्वी वेळोवेळी रस्ते सुधारणांसाठी श्री. गडकरी यांनी केंद्रातून निधी उपलब्ध करून दिला आहे. पोवई नाका येथील ग्रेड सेपरेटरसाठी श्री. गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिला होता. या निधीतून ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाले आहे. आगामी काळात श्री. गडकरी यांनी सेंट्रल रोड फंडमधून जिल्ह्याला झुकते माप देण्याची मागणी या वेळी उदयनराजेंनी केली. मागणी करतानाच त्यांनी जिल्ह्यातील रस्त्यांची तसेच इतर नवीन कामांचा प्रस्ताव श्री. गडकरी यांना दिला. यानुसार आगामी काळात जास्तीत जास्त निधी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देण्याचे आश्‍वासन मंत्री गडकरी यांनी उदयनराजेंना दिले. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालकृष्ण अडवाणी यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू, केंद्रीय मंत्री नड्डा यांनी घेतली भेट; हेल्थ बुलेटिन आलं समोर

Dhruv Rathee: सुनावणीपूर्वीच युट्युबर ध्रुव राठी लंडनला रवाना; दिल्लीच्या साकेत न्यायालयाकडून वॉरंट जारी

Latest Marathi News Live Update : पुण्यात राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांसह 10 ते 11 जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

IPL 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सच्या चॅम्पियनची 'एक्झिट'! ३ ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या दिग्गजाने सोडली टीमची साथ

FSSAI Notice: ऑनलाइन शॉपिंग करता? Flipkart, BigBasketला FSSAIची नोटीस! खाद्यपदार्थांबाबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT