Satara Latest Marathi News 
सातारा

दिलासादायक! खटावसाठी वरदान ठरलेल्या नेर धरणातून सोडले पाणी; बळीराजा झाला खुश

ऋषीकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यासाठी वरदान ठरलेल्या ब्रिटिशकालीन नेर धरणातून उन्हाळी हंगामासाठी नुकतेच पाणी सोडण्यात आले. सध्या धरणामध्ये 75 टक्के पाणीसाठा असल्याने एक महिना सलग पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

नेर धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन आणि सर्व कालव्यांची दुरुस्ती करूनही रब्बी हंगामासाठी पाणी मागणी अर्ज आले नाहीत. आता उन्हाळी हंगामासाठी मात्र शेतकऱ्यांनी अर्ज भरून पाण्याची मागणी केली आहे. त्यानुसार सोमवारी सायंकाळी नेर धरणातून थेट येरळा नदीत, तसेच नेर मुख्य कालव्यातून राम ओढा आणि खातगुण येथील नदीवरील बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले आहे. या सोडलेल्या पाण्याचा नेर, पुसेगाव, काटकरवाडी, खातगुण, भांडेवाडी, खटाव, सिध्देश्वर कुरोली आणि भुरकवडी या भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 

अर्ज भरण्याचे आवाहन 

उन्हाळी हंगामासाठी नेर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. सोडलेल्या पाण्याचा लाभ बागायती क्षेत्राला होणार आहे. विहिरींची पाणीपातळी वाढणार आहे. येरळा नदीकाठच्या गावांमधील शेतकऱ्यांनी अधिकाधिक पाणी मागणी अर्ज भरून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते आणि पाटबंधारे विभागाने केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपूरात क्रिप्टो, हवालातून कोट्यवधींचे व्यवहार; ‘एकांश’ने दुबईला पाठविले पैसे, पोलिसांनी सूचनापत्र देऊन सोडले!

Police Inspector Death : कार झाडाला धडकून भीषण अपघात; 45 वर्षीय पोलिस निरीक्षकाचा जागीच मृत्यू, पोलिस दलावर शोककळा

Latest Marathi News Live Update : सोलापूरचा तापमानाचा पारा पोहोचला थेट 43.2 अंशावर

Post Office Insurance: पोस्ट ऑफिसमध्ये मिळतो 50 लाखांपर्यंतचा विमा! कमी पैशात जास्त संरक्षण; ही योजना ठरेल तुमच्यासाठी ‘गेमचेंजर’

LSG चा खेळाडू बोलता-बोलता अचानक विराट कोहलीच्या पाया पडला अन् मग पुढे काय झालं, पाहा Viral Video

SCROLL FOR NEXT