
यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षण, वसतिगृह, सारथी यासारख्या सवलतींचे आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या केलेल्या पुनर्गठनाचे पुढे काय झाले? याचा गांभीर्याने विचार करा.
ढेबेवाडी (जि. सातारा) : "आरक्षणाबाबत एवढा अन्याय सुरू असताना तुम्ही गप्प का...? तुम्ही मराठा आहात, की राजकीय मराठा? निवडणुकीवेळी तुम्ही तुमच्या आवडीच्या पक्षांबरोबर राहा; पण आता राजकीय जोडे बाजूला ठेऊन न्याय्य हक्काच्या लढ्यात उतरा, तत्पूर्वी तुम्ही निवडून दिलेल्या आमदारांना फोन करून अर्थ संकल्पीय अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलायला सांगा,' असे आवाहन अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी नुकतेच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांना केले.
ते म्हणाले, ""आपण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी निगडित असलो, तरी सर्वांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे आपण सर्व जण मराठा आहोत. आर्थिक निकषावर आधारित आरक्षणासाठी वेगवेगळ्या संघटना 1980 पासून लढत आहेत. माझे वडील (कै.) आमदार अण्णासाहेब पाटील यांनी त्यासाठी पहिले बलिदान दिले आहे. कोपर्डीच्या घटनेनंतर सर्व मराठा समाज एकवटला. 52 क्रांती मोर्चे निघाले. 42 मराठा बांधवांनी बलिदान दिले.
सातारा जिल्हावासियांनाे! जाणून घ्या 23 केंद्र जेथे मिळेल तुम्हाला कोरोनावरील लस
यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षण, वसतिगृह, सारथी यासारख्या सवलतींचे आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या केलेल्या पुनर्गठनाचे पुढे काय झाले? याचा गांभीर्याने विचार करा. त्यात सध्याच्या सरकारने थोडी जरी भर टाकली असती तर सोन्याहून पिवळे झाले असते; परंतु आता आहे तेच बंद पाडले आहे. कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून प्रत्येक तालुक्यात अशी ठिय्या आंदोलने सुरू करून सरकारचे आरक्षणाकडे लक्ष वेधावे.''
नरेंद्र पाटील म्हणाले...
अनेक राजकारणी जाड कातडीचे असतात
जनतेतून सभागृहात गेल्यावर प्रश्नच विसरून जातात
अण्णासाहेब पाटील यांच्यासह 42 समाज बांधवांचे बलिदान व क्रांती मोर्चाचे श्रम वाया जाऊ देणार नाही
एक लाख मराठा उद्योजक तयार केल्याशिवाय हा अण्णासाहेबांचा मुलगा स्वस्थ बसणार नाही
यापूर्वी आंदोलनात उतरलेले अनेक जण आता गप्प का आहेत..?
तुम्ही मत दिलेल्या प्रत्येक आमदारांना आरक्षणावर बोलते करा
प्रत्येक तालुक्यात ठिय्या आंदोलन सुरू करा
कऱ्हाडकरांनाे! जाणून घ्या अर्थसंकल्पातील जनशक्तीची उपसूचना
धक्कादायक! शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येची प्रशासनास मागितली परवानगी
अपहरण प्रकरणी सेनेच्या नेत्यावर गुन्हा दाखल
सोसायटी ठरावावरून राडा; राजकारणातील गुन्हेगारी मोडण्यात प्रशासन कुचकामी
इथं काेणच डाॅन नाही, तडीपारांना कसा धडा शिकवायचा मला चांगलं माहितीये
Edited By : Siddharth Latkar