Satara Latest Marathi News Satara News 
सातारा

महाबळेश्वरच्या पर्यटनवाढीसाठी उद्या महत्वपूर्ण बैठक; मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर होणार चर्चा

अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर (जि. सातारा) : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार, जिल्हा प्रशासनाने महाबळेश्वर बाजारपेठ सुशोभीकरणाचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याची माहिती नागरिकांना देणे व त्या संदर्भात नागरिकांच्या सूचना, हरकतींबाबत चर्चा करण्यासाठी उद्या (ता. ६) महाबळेश्वर खादी ग्रामोद्योग येथील हॉलमध्ये दुपारी दोन वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. महाराष्ट्राचे नंदनवन व थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर प्रसिध्द आहे. देशभरातून दरवर्षी येथे साधारण 20 लाख पर्यटक भेट देत असतात, परंतु असे असले तरी महाराष्ट्रातील सर्वांचे आवडते ठिकाण उत्तर व दक्षिण भारतातील पर्यटन स्थळांमध्ये त्याचा समावेश नाही व याबाबत पुरेशी माहितीही नाही. महाबळेश्वरची मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी व्हावी व येथील बाजारपेठेची वेगळी ओळख देशाबरोबर जगात व्हावी या हेतूने या पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी अर्थसंकल्पात सुमारे 100 कोटींची तरतूद केली होती.

यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने महाबळेश्वर बाजारपेठेचा नियोजित विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या बाजारपेठेचा विकास व त्याच्या सुशोभीकरणाचा विकास आराखडा नुकताच तयार करण्यात आला असून त्याचे सादरीकरण शहरातील व्यापाऱ्यांसमोर करण्याच्या उद्देशाने उद्या येथे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बैठक आयोजित केली आहे. सदरच्या बैठकीला नागरिकांनी उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केले आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

Uruli Kanchan Firing Case : बारा दिवस उलटूनही गोळीबाराच्या गुन्ह्याचा तपास नाहीच? तपासावर प्रश्न चिन्ह

Latest Marathi News Update : मुंबई पोलिसांची रिक्षाचालकांविरुद्ध विशेष मोहीम; ३६ हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई

गर्दीच्या वेळी CSMT रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! प्लॅटफॉर्ममधील रुळावर व्यक्ती झोपला, समोरून ट्रेन आली अन्...; VIDEO VIRAL

Thane Crime: ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम, वर्षभरात ७ कोटींचा ड्रग्ज जप्त, १४६ आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT