karad 
सातारा

... इथं जनावरांच्या गोठ्यात राहताहेत माणसं!

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : काडीकाडीने उभारलेले संसार आगीत खाक होऊन तीन वर्षे उलटायला आली, तरी नव्याने निवारे उभारायला शासनाकडून हातभार लागलेला नाही. त्यामुळे वरचे घोटील (ता. पाटण) येथील सहा जळीतग्रस्त कुटुंबे अडचणीत आली आहेत. त्यातील काहींनी जनावरांच्या गोठ्यात, तर काहींनी पडक्‍या घरात आश्रय घेतला आहे. एक ना एक दिवस शासनाला आपली दया येईल या आशेवर ते दिवस ढकलत आहेत. 

ढेबेवाडीपासून 20 किलोमीटरवर दुर्गम जंगलात वरचे घोटील हे गाव आहे. तेथील सहा कुटुंबांचे वास्तव्य असलेल्या मोठ्या घराला आग लागल्याची घटना 27 नोव्हेंबर 2017 च्या मध्यरात्री घडली होती. आगीत 80 पोती धान्य, रोख रक्कम, दागिने व प्रापंचिक साहित्य जळून सुमारे 21 लाखांचे नुकसान झाले. निवारा बेचिराख झाल्याने उघड्यावर आलेल्या या कुटुंबांना विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती, लोकप्रतिनिधी, पतसंस्थांकडून धान्य, प्रापंचिक वस्तू, कपडे व काही रोख रक्कम मिळाली. मात्र, निवारे उभे करण्यासाठी तालुक्‍यापासून मंत्रालयापर्यंत अनेक हेलपाटे मारून आणि अनेकांचे उंबरठे झिजवून त्यांच्या नशिबी उपेक्षाच आलेली आहे. 

घरकुलांच घोडं अडलंय कशात? 
काही कुटुंबे जनावरांच्या गोठ्यात तर काही जळालेल्या घराजवळ शिल्लक राहिलेल्या एका पडक्‍या खोलीला प्लॅस्टिक कागद व पत्र्यांची पाने आडवी लावून दिवस कंठत आहेत. "कधी आमच्याकडे शासनाचे लक्ष जाणार आणि कधी वनवास संपणार? असा सवाल ही कुटुंबे करत आहेत. त्यांच्यासाठी नवीन घरकुले मंजूर असल्याचे अनेक दिवसांपासून सांगितले जात असले, तरी घोडं नेमके कशात अडलंय याचा संबंधितांनी शोध घेऊन जळीतग्रस्तांना न्याय देण्याची मागणी होत आहे. 

संपादन ः संजय साळुंखे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! २७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या भागात कसं असेल हवामान?

Land Acquisition: शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! भूसंपादनापूर्वी पोटहिस्सा निश्चित होणार, प्रत्यक्ष वहिवाटीनुसार मिळणार मोबदला

Rahul Gandhi: ‘मोदी-शहांना आम्ही वेडे करून सोडू’; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आरएसएसचे कॉर्पोरेटायझेशन झाले..

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

SCROLL FOR NEXT