Satara Latest Marathi News Satara Politics News 
सातारा

म्हसवडच्या उपाध्यक्षपदी धनाजी मानेंची बिनविरोध निवड

सल्लाउद्दीन चोपदार

म्हसवड (जि. सातारा) : म्हसवड पालिकेच्या उपाध्यक्षपदी धनाजी माने यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. स्नेहल सूर्यवंशी यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या रिक्तपदाची आज पालिका सभागृहात निवडणूक घेण्यात आली. 

पालिका उपाध्यक्षपदासाठी विरोधी गटातील कॉंग्रेसचे नगरसेवक अकिल काझी, नगरसेवक धनाजी माने या दोघांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज मागे घेण्याच्या वेळेपूर्वी काझी यांनी आपला अर्ज काढून घेतल्यामुळे माने यांचा एकच अर्ज शिल्लक राहिल्यामुळे नगराध्यक्ष भगतसिंग वीरकर यांनी धनाजी माने यांची बिनविरोध निवड घोषित केली. 

पालिका सभागृहामध्ये या निवडणुकीसाठी झालेल्या सभेस सत्ताधारी व विरोधी नगरसेवक व विरोधी गटाचे सर्व सदस्य उपस्थित होते. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच नगराध्यक्ष भगतसिंग वीरकर व पालिका मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी उपाध्यक्ष धनाजी माने यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IRAN-AMERICA WAR REASON : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला का केला? 'या' 5 कारणांमुळे सुरू झालंय भीषण युद्ध

Karachi US Consulate Protest : कराचीतील अमेरिकन दूतावासात घुसले निर्दशक, सैनिकांच्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू

US, Israel war on Iran : इस्त्रायल- इराण युद्धाचा फटका, पुण्यातून दुबईसाठी विमान सेवा २ दिवस राहणार बंद, अनेक प्रवासी अडकले

Chembur Accident: चेंबूर मजूर मृत्यू प्रकरण! विकसकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, महापौरांचे निर्देश

Latest Marathi News Update : हिंगोली शहरात उभी असलेल्या कारने घेतला अचानक पेट

SCROLL FOR NEXT