Satara Latest Marathi News Satara News 
सातारा

साताऱ्याच्या सुपुत्रांचा सेना पदकाने सन्मान; देशात उंचावली जिल्ह्याची मान!

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : विरमाडे (ता. वाई) येथील सैन्यदलात कमांडंट कर्नल या पदावर कार्यरत दुष्यंत सोनावणे यांना सेना मेडल जाहीर झाले आहे. श्री. सोनावणे यांना जाहीर झालेल्या या पदकामुळे विरमाडेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. दरम्यान, सैन्यदलात मेजर या पदावर कार्यरत सातारा येथील रोहित भोसले यांनाही सेना मेडल जाहीर झाले असून, जिल्ह्यातील या दोन सुपुत्रांमुळे सातारा जिल्ह्याचीही शान उंचावली आहे. विशेष म्हणजे सोनावणे आणि भोसले हे दोघेही सातारा सैनिक स्कूलचे विद्यार्थी आहेत. 

16 पंजाब पातियाळाचे कमांडंट कर्नल श्री. सोनावणे यांनी ऑपरेशन स्नो लेपर्डमध्ये अतिशय उल्लेखनीय नेतृत्व करत आपल्या टीमची चमक दाखवून दिल्यामुळे त्यांना सेना मेडल जाहीर झाले आहे. 24 मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये कार्यरत मेजर श्री. भोसले हे जम्मू-काश्‍मीर येथील नौसेरा सेक्‍टर येथे कार्यरत आहेत. 28 ते 31 मे 2020 या कालावधीत भारतीय सीमेवर लाइन ऑफ कंट्रोलमध्ये झालेल्या चकमकीत त्यांच्या टीमने अतिरेक्‍यांना कंठस्नान घातले. 

अतिशय अवघड आणि कठीण प्रसंगांचा सामना करत त्यांच्या टीमने ही मोहीम फत्ते केली होती. त्याची दखल भारतीय लष्कराने घेतली आहे. दरम्यान, विरमाडे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य तुषार सोनावणे, खरेदी-विक्री संघाचे संचालक राजेंद्र सोनावणे तसेच गावातील ग्रामस्थांनी श्री. सोनावणे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात सोशल मीडियावर चाईल्ड मोड येणार? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण शिफारस; ''इंटरनेट हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार..''

मराठवाड्यात FDA ची धडक कारवाई! व्हेज-नॉनव्हेज मिक्स, झुरळांचा सुळसुळाट; डोमिनोज आउटलेटचा परवाना रद्द

Latest Marathi News Live Update : जुहूमध्ये अभिनेता अजय देवगणच्या बंगल्यावर महापालिकेची मोठी कारवाई, अनधिकृत बांधकामाचे काही भाग पाडले

Crime News: श्रीरामनगरमध्ये ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; बारा तासाच्या आत चौघांना अटक

दोन थोबाडीत माराव्याश्या वाटत होत्या... ललित प्रभाकरला पहिल्यांदा कसाबच्या भूमिकेत पाहिल्यानंतर काय म्हणाले उज्ज्वल निकम?

SCROLL FOR NEXT