satara  sakal
सातारा

Satara : बेडगच्या लाँग मार्चमधील चौघांची प्रकृती खालावली

कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बेडग (ता. मिरज) गावातील स्वागत कमान ग्रामपंचायतीकडून पाडल्यानंतर त्याविरोधात त्यांच्या अनुयायांनी पायी लाँग मार्च सुरू केला आहे. घरांना कुलपे लावून बॅगा भरून लोक मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. तो लाँग मार्च आज कऱ्हाडमधून पुढे मार्गस्थ झाला. मात्र, लाँग मार्चमधील चौघांची प्रकृती अशक्तपणामुळे खालावली. त्यांना येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

सांगली जिल्ह्यातील बेडग (ता. मिरज) ग्रामस्थ मुंबईकडे चालत निघाले आहेत. सुमारे दीडशेहून अधिक कुटुंब लाँग मार्चमध्ये सहभागी आहेत. १६ जून रोजी बेडग गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान ग्रामपंचायतीने पाडली. त्यानंतर ग्रामपंचायतीविरुद्ध त्यांचे अनुयायी यांच्यात संघर्ष सुरू झाला. त्यातून समाजाने गाव सोडण्याचा निर्धार करत माणगाव ते मुंबई असा लाँग मार्च काढला आहे. तो लाँग मार्च कऱ्हाडमध्ये दाखल झाला.

मात्र, येथे त्यातील अजित कांबळे, तेजस कांबळे आणि अन्य दोघे अशा चौघांची प्रकृती खालावली आहे. त्यांना वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज पुन्हा लाँग मार्च मुंबईकडे रवाना झाला. त्यापूर्वी त्यांनी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर लाँग मार्च साता‍ऱ्याकडे मार्गस्थ झाला. या लाँग मार्चमधील कुटुंबांनी सांगली जिल्हा प्रशासनाने गाव सोडण्यास भाग पाडल्याचा आरोप करत निषेध केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: एकनाथ शिंदेंच्या मागे कोणता डाव? जरांगेंचा पुन्हा गौप्यस्फोट; हातात काय लागलं? कदमांच्या एका वक्तव्याने नवा संशय!

BEST Bus Employees: बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार? बोनसबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार

India Economic Growth: भारताची विकासगाथा प्रभावी; रायशे यांचे प्रतिपादन; द्विपक्षीय सहकार्यावरही भर

Marathi News Live Updates: देवेंद्र फडणवीस यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बजावला मतदानाचा हक्क

'मी आधी सुप्रियाच्या कामाच्या प्रेमात पडलो मग तिच्या' बायकोबद्दल बोलताना सचिन पिळगांवकर म्हणाले...'ती माझ्यापेक्षा खूप...'

SCROLL FOR NEXT