सातारा

तीन सख्ख्या बहिणींच्या मृत्यूचे गुढ उकलणार !

हेमंत पवार

कऱ्हाड : एकाच कुटुंबातील तीन मुलींचा डिसेंबरमध्ये सैदापूर (ता. कऱ्हाड) येथे मृत्यू झाला होता. त्या तीनही मुलींच्या उलटीचे नमुने व व्हिसेरा तपासणीसाठी पुणे, मिरज प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल शहर पोलिसांना प्राप्त झाले आहेत. पोलिस निरीक्षक राहुल वरुटे यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.
 
सैदापूर येथील तीन सख्ख्या बहिणींचा डिसेंबर 2020 मध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. संबंधित मुलींच्या आईसह त्या तिघींना जेवणानंतर उलट्या झाल्या. रुग्णालयात उपचार सुरू असताना एकापाठोपाठ आयुषी सासवे (वय 3 वर्षे), आरुषी सासवे (8), आस्था शिवानंद सासवे (9) या तिन्ही बहिणींचा मृत्यू झाला होता. तीन मुलींचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता.

बाबा मी बरी झालीय, मला घरी यायचंय.. आराध्याची आर्त हाक आजोबांच्या मनाचा ठाव घेऊन गेली!

मुलींच्या उलट्यांचे नमुनेही तपासणीला पाठवले होते. दरम्यान, या घटनेनंतर पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलिस निरीक्षक राहुल वरुटे यांनी याचा तपास केला. तब्बल दोन महिन्यांनी त्याचा अहवाल शहर पोलिसांना प्राप्त झाला आहे. पोलिसांनी हा अहवाल अत्यंत गोपनीय ठेवला आहे. या अहवालात नेमके काय आहे याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 

पोलिसांकडून पुन्हा तपास? 

सैदापूर येथील तिन्ही सख्ख्या बहिणींच्या मृत्यूचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. हा अहवाल पोलिसांना मिळाला असला, तरी पोलिस शासकीय वैद्यकीय तज्ज्ञांशी संवाद साधून पुढील तपास करणार असल्याचे समजते.

मृत महिलेच्या दागिन्यांची झाली चोरी; सिव्हीलची अब्रू चव्हाट्यावर

शिक्षणमंत्र्यांचं सर्व काही ऐकलं! आम्हांला काहीच नाही मिळालं; शैक्षणिक संस्थांची नाराजी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT