सातारा

छत्रपती शिवाजी महाराज देशाची अस्मिता; 'महाविकास'च्या निर्णायवर उदयनराजेंनी केली भुमिका स्पष्ट

सिद्धार्थ लाटकर

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या 19 फेब्रुवारीस साध्यापणाने साजरी करण्यासाठी शिवजयंती मंडळांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य शासनाने काही निर्बंध देखील घातले आहेत. यामुळे राज्यात शिवप्रेमींमधून संतापाची लाट उसळली आहे. हे निर्बंध मागे घ्यावेत अशी मागणी हाेत आहे.

दरम्यान खासदार उदयनराजे भाेसले यांनी आज (रविवार) कास धरणाच्या भिंतीचे सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर साता-यात विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांनी उदयनराजेंना राज्य शासनाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती उत्सवावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात असून हे निर्बंध मागे घेण्यात यावे, अशी मागणी हाेत असल्याचे सांगितले. 

त्यावर उदयनराजे म्हणाले, संकटकाळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनतेचा जीव धाेक्यात घातला असता का ? असा प्रतिप्रश्न केला. काेराेनामुळे अनेकांना जवळचे नातेवाईक गमवावे लागले. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे एकमेकांची काळजी घेण्याची. छत्रपती शिवाजी महाराजांनीही सर्वांना जपण्याची भुमिका बजावली हीच भुमिका आपल्याला बजावावी लागणार आहे. शिवजयंती साजरी झालीच पाहिजे पण काळजी घेऊनच असेही उदयनराजेंनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबतच्या सरकारने जारी केलेल्या अधिकृत मार्गदर्शक सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result पेपरफुटीनंतर गुणांचा महाघोटाळा, अन्सर की अन् स्कोअरकार्डवर वेगवेगळे गुण; बीडच्या 2 विद्यार्थ्यांचा आक्षेप

Bank Holiday: 20 ते 26 जुलैदरम्यान 'या' दिवशी बँका राहणार बंद; बँकेत जाण्याआधी पाहा RBIची यादी

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुंबईत CJP चे आंदोलन, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Tukaram Mundhe यांच्या धाडीनंतर अकोल्यातील गुटखा कारवाईत मोठा ट्विस्ट, काय घडलं?

Corona Virus: कोरोना परत येतोय? महाराष्ट्रात ४८ जणांना लागण; धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT