सातारा

माझ्या तर बुद्धीच्या बाहेर आहे, त्यांनाच विचारा; उदयनराजेंचा टाेला

सिद्धार्थ लाटकर

सातारा : रात्रीची संचारबंदी लागू केली आहे हे नेमके काय लॉजिक आहे ? या प्रश्‍नावर मला तर काहीच कळाले नाही. माझ्या बुद्धीच्या बाहेर आहे. ज्यांनी लागू केली त्यांनाच विचारा अशी टिप्पणी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केली.

बुधवारी (ता.24) खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस होता. कोविड 19 चे नियम सर्वांना पाळावेत आणि काळजी घ्यावी असा सल्ला देत उदयनराजेंनी वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द करुन परगावी जाणे पसंत केले. गुरुरवारी (ता.25) ते साता-यात आले होते.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार उदयनराजे भोसले जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेण्यास आले होते. प्रशासनातील अधिका-यांच्या भेटीनंतर त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांस उत्तर दिले. रात्रीची संचारबंदी लागू केली आहे हे नेमके काय लॉजिक आहे. या प्रश्‍नावर खासदार उदयनराजे भोसले म्हणाले मला तर काहीच कळाले नाही. माझ्या बुद्धीच्या बाहेर आहे. ज्यांनी लागू केली त्यांनाच विचारा.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या सात दिवासांत आवश्‍यकता भासल्यास लॉकडाऊन करु असा इशारा दिला आहे. तुम्हांला काय वाटते या प्रश्‍नावर उदयनराजे म्हणाले लॉकडाऊन हा काही पर्याय नाही. हा रस्ता बंद केला आणि तो रस्ता खूला केला. तर जो रस्ता बंद केला तेथे व्हायरस नाही असे म्हणता येणार नाही. तुम्हांला तरी गॅरंटी आहे का असा प्रतिप्रश्‍न उदयनराजेंनी केला.

लॉकडाऊन हा पर्याय नाही. माझ्या माहितीप्रमाणे दोन मिलियनच्यावर व्हायरस आहेत. लॉकडाऊन करुन काय करणार. दक्षता घेतली पाहिजे. प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे. आता लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. परंतु व्हायरसचे स्ट्रेन बदलतात, मी तज्ञ नाही पण वाचनात आल्याचे उदयनराजेंनी नमूद केले.सध्या सर्वत्र ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरु आहेत. काही ठिकाणी ऑफलाईन सुरु असतील. तेथील विद्यार्थ्यांची काळजी घेणे आपले कर्तव्य असल्याचे उदयनराजेंनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

RCB Party: दोघांना एकत्र बघून डोळ्यात पाणी आलं..." आरसीबीच्या विजयापेक्षा विराट-भुवीच्या 'त्या' जुन्या मैत्रीच्या व्हिडिओने जिंकली मनं!

‘जोडीचा मामला’चा अनोखा प्रयोग; अवधूत गुप्तेंकडून नाटकाच्या टीमचे कौतुक

MP Supriya Sule : गुन्हेगारी कमी झाल्याचे पत्र शहा-फडणवीसांना पाठवा! पोलिस आयुक्तांनी पाठविलेल्या पत्रावर सुप्रिया सुळे यांचा पोलीस आयुक्तांना टोला

Latest Marathi News Live Update : सुरतमध्ये दोन बसची धडक: 6 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT