esakal | चिंताजनक : विद्यार्थ्यांचे नातेवाईकही येऊ लागलेत कोरोना पॉझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

चिंताजनक : विद्यार्थ्यांचे नातेवाईकही येऊ लागलेत कोरोना पॉझिटिव्ह}

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुसेगाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. 

चिंताजनक : विद्यार्थ्यांचे नातेवाईकही येऊ लागलेत कोरोना पॉझिटिव्ह
sakal_logo
By
ऋषिकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : पुसेगाव येथील श्री सेवागिरी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सात नातेवाईक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या विद्यालयातील 25 विद्यार्थी बाधित असून, त्यांच्या संपर्कातील मित्र व नातेवाईकांचीही तपासणी केली जात आहे. नातेवाईकही कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागल्याने येथील परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. 

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुसेगाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या संपर्कातील नातेवाइकांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये पुसेगाव तीन, बुध तीन, काटकरवाडी एक अशा सात रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

त्यामुळे पुसेगाव परिसरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे दिसून येत आहे. उर्वरित विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांनी तपासणी तातडीने करून घ्यावी, असे आवाहन डॉ. आदित्य गुजर यांनी केले आहे.
 

Video पाहा : आता काेल्हापूर, सांगलीही गृहराज्यमंत्र्यांचे टार्गेट 

तोंड लपवत पळून जाण्याचा प्रयत्न फसला; पुण्यासह, बारामतीच्या जुगाऱ्यांवर साताऱ्यात गुन्हा दाखल 

बाळाचा बोटीत जन्म; ग्रामस्थांत आनंदाश्रू

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा झाला निर्णय

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आहात? तपासणी करा! अन्यथा गुन्हा दाखल हाेईल

Edited By : Siddharth Latkar