सातारा

'कृष्णा खोरे'कडून मंजुरी मिळूनही गाढवलीत विकासकामे रखडली

संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : कोयना पुनर्वसन अंतर्गत गाढवली पुनर्वसन येथे विकासकामांसाठी तांत्रिक मंजुरी मिळूनही कामे रखडली असून, ही कामे तातडीने पूर्ण होण्याची आवश्‍यकता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

कोयना धरणामुळे गाढवली हे गाव विस्थापित झाले होते. या गावाने धरणासाठी त्याग केला आहे. मात्र, या गावाला 18 नागरी सुविधा मिळाल्या नव्हत्या. तत्कालीन कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता यु. व्ही. सिधमल यांनी गाढवली येथे भेट देऊन रखडलेली कामे करण्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार गाढवली येथे काही कामे मार्गी लागली होती. मात्र, 2018-19 मध्ये कोयना पुनर्वसन अंतर्गत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांच्याकडून तांत्रिक मंजुरी मिळूनही चार प्रमुख कामे रखडलेली आहेत. यामध्ये स्मशानभूमी शेड बांधण्यासाठी दोन लाख 50 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. प्राथमिक शाळेस संरक्षक भिंत बांधणे यासाठी 12 लाख 72 हजार रुपये निधी मंजूर असून, स्मशानभूमी पोच रस्त्यासाठी 5 लाख 34 हजार रुपये निधी प्रस्तावित आहे. गावातील अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरणसाठी 11 लाख 74 हजार रुपये निधी प्रस्तावित आहे. ही कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

कोयना पुनर्वसनमधून गाढवली येथील रखडलेली कामे तातडीने मार्गी लावून कृष्णा खोरे विकास महामंडळाने ग्रामस्थांना दिलासा द्यावा.'' 
-बबनराव शिंदे, सरपंच, गाढवली पुनर्वसन, ता. जावळी  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loco Pilot Leaves Train : ट्रेन अर्ध्यातच उभी करुन निघून गेला लोको पायलट; होळीच्या गर्दीत प्रवाशांना ३ तास सहन करावा लागला मनस्ताप

Latest Marathi News Live Update : इराण युद्धाचा पाकिस्तानला तगडा झटका

CM Pushkar Singh Dhami: ईराण-इस्रायल युद्धामुळे सरकार अलर्ट! उत्तराखंडच्या एकाही नागरिकाला धक्का लागू देणार नाही; CM धामींचा शब्द

Kolhapur Story : सुमेदच्या स्मृतींना मिळणार हिरवेगार रूप; वृक्षपेढीतून जतन; कुटुंबीयांकडून पुढाकार, अंध विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण

Rare Bird Spotted : सह्याद्रीच्या कुशीत दुर्मीळ शिकारी पाहुणा! भुदरगडमध्ये; ‘शाही ससाणा’चे दर्शन

SCROLL FOR NEXT