सातारा

'आर्थिक पिळवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना कॉंग्रेस धडा शिकवेल'

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) ः वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्‍यांत काही शासकीय अधिकारी सर्वसामान्य जनतेची कामे न करता त्यांची पिळवणूक करीत असून या अधिकाऱ्यांना कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून धडा शिकविण्यात येईल, असा इशारा सातारा जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
 
यावेळी तालुकाध्यक्ष कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र भिलारे, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद अनपट, ऍड. प्रतापराव देशमुख, अतुल संकपाळ, विशाल डेरे, विकास जाधव उपस्थित होते. काही शासकीय अधिकारी, बॅंका-पतसंस्थांचे अधिकारी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. लॉकडाउनमध्ये वाढलेल्या महागाईने सामान्य जनता त्रस्त झाली आहे. व्यवसाय- धंदे बंद असल्याने आणि रोजगार नसल्याने जनता मेटाकुटीला आली आहे. बॅंका, पतसंस्थांची कर्जे, सरकारी देणी, घरपट्टी, पाणीपट्टी, भरमसाट आलेली लाइट बिले अशा समस्यांचा सामना करताना सर्व जनता भरडून निघाली आहे. या बाबींचा विचार सरकारी अधिकाऱ्यांनी करावा, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले.

बहुतेक सरकारी कार्यालयांत लोकांची काही अधिकाऱ्यांकडून आर्थिक पिळवणूक चालू आहे. सर्वसामान्य लोकांची पैशाअभावी कामे होत नाहीत. हेलपाटे मारून जनता त्रस्त झाली आहे. या सरकारी अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा अंकुश नाही, असे नमूद करून श्री. शिंदे म्हणाले, ""कोरोनासारख्या भीषण संकटातही या अधिकाऱ्यांची मानसिकता बदललेली दिसत नाही. लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेत असतील तर कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल.'' कॉंग्रेस सत्तेत असला तरी सामान्य जनतेच्या हितासाठी भ्रष्ट लोकांना पाठीशी घालणार नाही. सामान्य जनतेला कोणी वाली राहिला नाही, अशा भ्रमात शासकीय अधिकाऱ्यांनी राहू नये. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज तोडू नये, बॅंका आणि पतसंस्थांनी थकीत कर्जदारांकडे वसुलीचा तगादा लावू नये, असे आवाहन करताना जनतेची आर्थिक पिळवणूक करणाऱ्यांना कॉंग्रेस धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT