jio airtel vodafone 
विज्ञान-तंत्र

Airtel, Vi आणि Jio चे छोटे रिचार्ज; कमी किंमतीत मिळतो कॉलिंग-डेटा

सकाळ डिजिटल टीम

जर तुमचा डेली मिळणारा डेटा किंवा तुमचा टेरिफ प्लॅन अचानक संपला तर कॉल करण्यासाठी तुम्हाला छोटासा रिचार्ज करावा लागतो. काहीवेळा पॅकची डेटा लिमीट संपल्यावर चित्रपट किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी एक छोटासा रिचार्ज देखील कामी येतो. टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्यानंतर जूने अनेक प्लॅन बंद पडले आहेत. तुम्हालाही अशा छोट्या रिचार्ज पॅकची गरज पडत असल्यास, आज आपण Airtel, Vodafone-Idea आणि Jio च्या अशा रिचार्ज प्लॅनची ​​यादी तयार केली आहे, ज्यांची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे. या कंपन्यांच्या छोट्या रिचार्जमध्ये तुम्हाला अमर्याद टॉक टाईमसह डेटाचा फायदाही मिळेल.

एअरटेलचे 100 च्या आत बेस्ट प्लॅन

19 चा प्रीपेड पॅक : हा कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. हा पॅक 2 दिवसांच्या वैधतेसह येतो, ज्यामध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगसह 200MB डेटा मिळतो. पॅकमध्ये एसएमएस मिळणार नाहीत.

99 चा प्रीपेड पॅक : हा स्मार्ट रिचार्ज कॅटेगरीचा पॅक 28 दिवसांच्या वैधतेसह येतो, ज्यामध्ये ग्राहकांना 99 रुपये (1P/sec) चा टॉकटाइम आणि 200MB डेटा मिळतो. या प्लॅनमध्येही एसएमएसचा फायदा मिळत नाही.

100 च्या Vi चे बेस्ट प्लॅन

49 प्रीपेड पॅक : या पॅकची वैधता 10 दिवस आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 38 रुपयांचा टॉकटाइम आणि 100MB डेटा मिळतो. पॅकमध्ये SMS लाभ मिळत नाही.

79 प्रीपेड पॅक : या पॅकची वैधता 21 दिवस आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 64 रुपयांचा टॉकटाइम आणि 200MB डेटा मिळतो. पॅकमध्ये SMS लाभ मिळत नाही.

99 प्रीपेड पॅक : या पॅकची वैधता 28 दिवस असून या प्लॅनमध्ये ग्राहकांना 99 रुपयांचा टॉकटाइम आणि 200MB डेटा मिळतो. पॅकमध्ये SMS लाभ मिळत नाही.

JioPhone साठी 100 च्या आत प्लॅन

75 प्रीपेड पॅक : JioPhone चा हा प्लॅन 23 दिवसांची वैधतेसह देतो. प्लॅनमध्ये, ग्राहकांना 23 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग, 50 एसएमएस आणि एकूण 2.5 GB डेटा (100MB दैनिक डेटा + 200MB) मिळतो. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud सारख्या Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

91 प्रीपेड पॅक : JioPhone च्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये, ग्राहकांना 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग, 50 एसएमएस आणि एकूण 3 GB डेटा (100MB दैनिक डेटा + 200MB) मिळतो. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud सारख्या Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

Rajya Sabha Election: विदर्भातून राज्यसभेवर कोण जाणार? भाजपच्या तंबूत तीव्र लॉबिंग सुरू, 'या' तीन बड्या नेत्यांची नावे चर्चेत

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

Latest Marathi News Live Update : अक्षता टाकण्यापूर्वीच वरपित्याचा मृत्यू..!

Thane News: वालधुनी नदीवर घाट उभारणीस अडथळा, ३० घरांना नोटीसा; दोन दिवसांत घरे रिकामी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT