जिओने पुन्हा लाँच केले 5 नवे प्लॅन; वाचा काय आहेत बेनिफिट्स

Jio
Jiosakal

Airtel, Vodafone Idea नंतर Reliance Jio ने देखील आपले प्री-पेड प्लान 20 टक्क्यांनी महाग केले आहेत. Reliance Jio ने Jio फोनच्या 75 रुपयांच्या प्लॅनची किंमत वाढवली नाही पण त्याची वैधता कमी केली आहे. याशिवाय, इतर प्री-पेड प्लॅनमध्ये 400 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. जिओचे नवीन प्लॅन एक डिसेंबरपासून लागू झाले आहेत.

नवीन अपडेटनंतर, जिओने आपल्या प्लॅनमधून OTT काढून टाकले होते आणि आता कंपनीने पाच नवीन प्री-पेड प्लॅन सादर केले आहेत ज्यामध्ये डिस्ने + हॉटस्टारसह जिओ प्लॅन्स परत देण्यात आले आहेत, परंतु त्यांची किंमत वाढवण्यात आली आहे. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

Jio
‘आफ्स्पा’ कायदा काय आहे? का होतेय रद्द करण्याची मागणी? वाचा सविस्तर

601 रुपयांच्या प्लॅन

जिओने डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शनसह प्लॅन पुन्हा सादर केली आहेत, परंतु त्यांच्या किंमती वाढवल्या आहेत. जिओ आता डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन 601 रुपयांच्या प्लॅनमध्ये देत आहे. हा प्लॅन आधी 499 रुपयांचा होता. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांच्या वैधतेसह 3 GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS दररोज मिळतील. डिस्ने + हॉटस्टार प्लॅनसह 1 वर्षासाठी सबस्क्रिप्शन मिळेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 6GB अतिरिक्त डेटा देखील मिळेल.

700 रुपयांचा प्लॅन

Jio कडे Disney + Hotstar सोबत 799 रुपयांचा आणखी एक प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत पूर्वी 666 रुपये होती. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे. यासोबतच अमर्यादित कॉलिंग, जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध असतील. या प्लॅनची ​​वैधता 56 दिवसांची आहे.

Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन असलेला तिसरा प्लॅन

Disney + Hotstar च्या एका वर्षाच्या सबस्क्रिप्शनसह येणार्‍या तिसर्‍या प्लॅनची ​​किंमत 1,066 रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची आहे. या प्लॅनची किंमत आधी 888 रुपये होती. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अतिरिक्त 5 GB डेटा मिळणार आहे.

Jio
Jio vs Airtel vs VI: 84 दिवसांचा कोणाचा प्लॅन आहे सर्वात स्वस्त?

3,199 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या प्लॅनची किंमत आधी 2,599 रुपये होती. आता ती वाढली आहे या प्लॅनमध्ये तुम्हाला डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन देखील एक वर्षासाठी उपलब्ध असेल. याशिवाय या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये एकूण 730GB डेटा आणि 10GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे.

659 रुपयांचा प्लॅन

हा प्लॅन अमर्यादित कॉलिंगचा नसून तो एक क्रिकेट पॅक आहे. यामध्ये दररोज 1.5GB डेटा मिळणार आहे. यासोबतच डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी उपलब्ध असेल. या प्लॅनची किंमत आधी 549 रुपये होती.

Jio
टाटाच्या 'या' कार्सवर मिळतोय जबरदस्त डिस्कांउट; पाहा डिटेल्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com