Amazon AI Ready eSakal
विज्ञान-तंत्र

Amazon AI Ready : अमेझॉन 20 लाख लोकांना बनवणार एआय-साक्षर; कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा

एआय रेडी अभियानात विविध प्रकारचे एआय टूल्स आणि कोर्सेस शिकवण्यात येणार आहेत.

Sudesh

सध्या जगात सगळीकडे एआयची चर्चा सुरू आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सबाबत सर्वांनी ऐकलं असलं, तरी त्याची परिपूर्ण माहिती बहुतांश लोकांना नाही. यामुळेच अमेझॉन कंपनी आता जगभरातील 20 लाख लोकांना एआय प्रशिक्षण देण्याच्या तयारीत आहे. यासाठी अमेझॉनने 'एआय रेडी' अभियानाची घोषणा केली आहे.

एआय रेडी अभियानात विविध प्रकारचे एआय टूल्स आणि कोर्सेस शिकवण्यात येणार आहेत. यामध्ये 8 मोफत एआय आणि जनरेटिव्ह एआय कोर्सेसचा समावेश आहे. यासोबतच, कंपनी लोकांना स्कॉलरशिप देखील देणार आहे. तसंच, विविध प्लॅटफॉर्मसोबत यासाठी कोलॅबरेशन करण्यात येईल. फायनॅन्शिअल एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

नोकरीमध्ये होणार फायदा

सध्या जगभरातील वर्कप्लेसमध्ये 'एआय रेडी', म्हणजेच एआयची माहिती असणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी वाढली आहे. AWS (अमेझॉन वेब सर्व्हिसेस) संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये असं दिसून आलं आहे, की जवळपास 73 टक्के कंपन्या अशा कर्मचाऱ्यांना प्राधान्य देत आहेत, ज्यांना एआय बाबत माहिती आहे. एआयचं ज्ञान असणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतरांपेक्षा 47 टक्के अधिक पगार मिळत असल्याचंही या सर्वेक्षणात स्पष्ट झालं आहे. (Tech News)

कंपनीची मोठी गुंतवणूक

अमेझॉन या एआय रेडी अभियानासाठी तब्बल 12 मिलियन डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक करणार आहे. 2025 सालापर्यंत किमान 20 लाख लोकांना एआय-साक्षर बनवण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT