Auto Tips esakal
विज्ञान-तंत्र

Auto Tips : रतन टाटांच्या 'आयडिया'ने बदलला सिएरा एसयूव्हीचा चेहरा, आता देणार थारला टक्कर

सुमारे तीन दशकांपूर्वी सिएरा कार लाँच झाली

सकाळ डिजिटल टीम

Auto Tips : सुमारे तीन दशकांपूर्वी सिएरा कार लाँच झाली तेव्हा रतन टाटा यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून कंपनीची सूत्रे हाती घेतली होती. साहजिकच कंपनीसाठी सिएराला खूप महत्त्व आहे. सिएरा कॉन्सेप्ट कार 2023 ऑटो एक्सपोमध्ये EV स्वरूपात प्रदर्शित करण्यात आली होती. ही कार 2024 च्या उत्तरार्धात किंवा 2025 च्या सुरुवातीला लाँच होण्याची शक्यता आहे.

याशिवाय सिएराचा पेट्रोल व्हेरियंट देखील उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. तुलनेत, मूळ टाटा सिएरा फक्त डिझेल पॉवरट्रेनसह ऑफर करण्यात आली होती. एका मुलाखतीत, टाटा मोटर्सचे ग्लोबल डिझाईनचे व्हीपी प्रमुख मार्टिन उहलारिच यांनी सिएरा कन्सेप्ट कशी विकसित केली गेली याबद्दल इंटरेस्टिंग माहिती शेअर केली.

रतन टाटा यांनी या कारसाठी दिलेल्या इनपुटबद्दल एक मनोरंजक कथा आहे, ज्यामध्ये त्यांनी मजबूत बी-पिलर आणि रॅप-अराउंड रियर विंडो ठेवण्यास सांगितले. ही केवळ एक अनौपचारिक टिप्पणी नव्हती तर सिएरामधील काही प्रमुख डिझाइनमध्ये रतन टाटांच्या सजेशनचा वापर करण्यात आला. सिएरा कॉन्सेप्टमध्ये त्यांच्या इनपुटने सिएराला अपेक्षित उंचीवर नेले. तीन दशकांपूर्वी एसयूव्हीच्या यशात योगदान देणाऱ्या रतन टाटा यांच्या सूचना नव्या कारला प्रचंड उपयोगी पडल्या.

सफारीचे यशस्वी लॉंचमुळे टाटांना सिएरा सारख्या इतर जुन्या मॉडेलला पुनरुज्जीवित करण्याच्या दृष्टीने आत्मविश्वास वाढ. टाटाला. त्यांच्या डिझाईन टीमने सध्याच्या पिढीला आवडेल असे आधुनिक प्रोफाइल तयार करताना मूळ सिएराचे मूळ सार कायम ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT