
Auto Tips : फक्त २१ हजारात आपल्या नावे करा महिंद्राची राऊडी XUV 400 ईव्ही
Auto Tips : भारतीय वाहन निर्माती कंपनी महिंद्रा आणि महिंद्राच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची देशातल्या ग्राहकांना गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा होती. मात्र या XUV 400 ची प्रतीक्षा आता संपली असून गाडीचं बुकिंग आता सुरू झालंय. तुम्हाला ही महिंद्राची इलेक्ट्रिक कार आवडली असेल आणि तुम्हाला ही कार तुमच्या नावावर बुक करायची असेल, त्यासाठी फक्त 21 हजार रुपये बुकिंग रक्कम भरावी लागेल. तुम्ही कंपनीच्या अधिकृत साइटला भेट देऊन किंवा तुमच्या घराजवळील महिंद्रा डीलरशिपला भेट देऊन गाडी बुक करू शकता. या कारची डिलिव्हरी मार्च 2023 पासून सुरू होईल.
महिंद्रा कंपनीची लेटेस्ट इलेक्ट्रिक कार महिंद्रा XUV 400 ही भारतात एक्स १०० प्लटॅफॉर्मवर विकसित केली आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये एलजी हाय एनर्जी डेन्स एनएमसी बॅटरी देण्यात आली आहे. असं म्हटलं जातंय की, ही बॅटरी टाटा नेक्सॉन ईव्हीमध्ये देण्यात आलेल्या बॅटरीपेक्षा जास्त पॉवरफुल आहे. त्यामुळे या बॅटरीची रेंज जास्त असू शकतो. XUV400 EC (3.3 kW चार्जर) मॉडेलची किंमत 15 लाख 99 हजार रुपये (एक्स-शोरूम), XUV400 EC (7.2 kW) व्हेरिएंटची किंमत 16 लाख 49 हजार रुपये आणि XUV400 EL (7.2 kW) व्हेरिएंटची किंमत 19 लाख रुपये आहे.
Mahindra XUV400 ड्रायव्हिंग रेंज
या कारच्या EL वेरिएंटमध्ये 39.4 kWh बॅटरी आहे जी सिंगल चार्जवर 456 किमी ड्रायव्हिंग रेंज देते असं कंपनीने म्हटलय. तर EC प्रकारात 34.5 kWh बॅटरी आहे जी सिंगल चार्जमध्ये 375 किमी ड्रायव्हिंग रेंज देते.
या कारच्या लूक आणि फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास ही कार 4.2 मीटर लांब असेल. यामध्ये क्लोज्ड फ्रंट ग्रिल, नवीन डिझाईन केलेले हेडलॅम्प, इंटिग्रेटेड डीआरएल, उत्तम टेलगेटसारखे फीचर्स, व्हायरल स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीवाली मोठी टचस्क्रीन इन्फोटेन्मेट सिस्टिम, Adreno X कनेक्टेड कार आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नोलॉजी आणि अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टमसह (ADAS) अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.