Auto Tips in Marathi esakal
विज्ञान-तंत्र

Auto Tips : कारच्या टचस्क्रीनवर स्क्रॅच ? या 5 आयडिया वापरुन स्क्रीन करा चकाचक !

कारमधील टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आपल्या सर्वांना आवडते

सकाळ डिजिटल टीम

Auto Tips : कारमधील टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आपल्या सर्वांना आवडते. पण सतत सतत हात लावल्याने टच-सेंसिटिव डिस्प्ले खराब होण्याची शक्यता असते. आपण या नाजूक डिजिटल स्क्रीनची काळजी घ्यायला बऱ्याचदा विसरतो .

आपण अनेकदा कारच्या टचस्क्रीनला घाणेरडे किंवा घामाने भिजलेल्या हातांनी स्पर्श करतो, त्यामुळे स्क्रीनवर बोटांचे ठसे किंवा ओरखडे पडतात. याशिवाय, कधीकधी साफसफाईमुळे डिस्प्ले स्क्रॅच होतो. म्हणूनच तुम्ही कारची टचस्क्रीन कशी स्वच्छ कराल यासाठी या पाच टिप्स उपयोगाच्या ठरतील.

हल्ली कार मोठ्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह येतात आणि ऑटो कंपन्या आता प्रत्येक नवीन मॉडेलसह या स्क्रीन मोठ्या बनवत आहेत. त्यामुळे, तुमच्या मंथली बजेटला कुठलाही धक्का न लावता तुमच्या कारच्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिटमधील ओरखडे मिटवण्यासाठी काही टिप्स तुम्हाला मदत करतील.

१. टूथपेस्ट : टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिटवर जिथे जिथे ओरखडे असतील तिथे मायक्रोफायबर कापडाने थोड्या प्रमाणात टूथपेस्ट घासल्याने लहान स्क्रॅच म्हणजेच ओरखडे निघून जातील. शिवाय टूथपेस्ट हळूहळू गोलाकार पद्धतीने घासल्यास चांगले परिणाम मिळतील.

२. बेकिंग सोडा आणि पाणी : बेकिंग सोडा ओरखडे काढण्यासाठी खूप प्रभावी आहे. यासाठी, बेकिंग सोडा पाण्यात मिसळावा, त्याची पेस्ट स्क्रीनवर लावावी. आता मायक्रोफायबर कापड वापरून, ही 'पेस्ट' स्क्रॅच केलेल्या भागावर गोलाकार हालचालीत हलक्या हाताने घासल्यास बहुतेक किरकोळ ओरखडे निघून जातील.

३. बेबी शाम्पू : तुमच्या कारच्या टचस्क्रीन युनिटवरील स्क्रॅच मोठ्या नसल्यास, मायक्रोफायबर कापडाने बेबी शाम्पू हलक्या हाताने घासल्याने हे ओरखडे निघून जातील. शिवाय, तुमच्या कारच्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिटमधील ओरखडे काढण्यासाठी बेबी शॅम्पू वापरल्याने तुमच्या कारचा वासही चांगला येईल.

४. व्हेजिटेबल ऑईल : तुमच्या कारच्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिटमधील ओरखडे काढण्यासाठी व्हेजिटबल ऑईल खूप प्रभावी आहे कारण ते स्क्रॅच केलेल्या भागात जाऊन काम करतं.

५. कार व्हॅक्स : व्हेजिटेबल ऑईल प्रमाणे कार व्हॅक्स तुमच्या कारच्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिटच्या स्क्रॅच केलेल्या भागात आतापर्यंत जातं. याशिवाय, ते टचस्क्रीनला अतिशय स्मूथ आणि स्लीक बनवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT