Travel News : सगळीकडे फिरून झालं आता कुटुंबसह ही ट्रीप एन्जॉय करा, वाचा खर्च अन् ठिकाण

चला तर आज आपण स्वस्तात मस्त भारतातील काही क्रूजबाबत जाणून घेऊया
Travel News
Travel NewsEsakal

Travel News : फिरायला जाणे कोणाला आवडत नसेल असे क्वचितच कोणीतरी तुम्हाला म्हणेल. वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणे ही प्रत्येकाची आवड असते. तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत बऱ्याच ठिकाणी फियारला जाता. मात्र तुम्हाला माहितीये काय तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर क्रूजमध्ये सुद्धा सुट्ट्या एन्जॉय करु शकता.

केवळ परदेशात जाण्यासाठीच लोक महागडी क्रूज ट्रीप करतात असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचा विचार करताय. चला तर आज आपण स्वस्तात मस्त भारतातील काही क्रूजबाबत जाणून घेऊया.

रिपोर्टनुसार, नॉर्वेजियन क्रूझ लाइन एनसीएलने गेल्या नोव्हेंबरमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक बुकिंग सप्ताह साजरा केला आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार NCL द्वारे आयोजित, 10 पैकी 8 भारतीय पुढील 12 महिन्यांत आंतरराष्ट्रीय क्रूझ सुट्टी घालवण्याचा विचार करत आहेत. मात्र तुम्हाला क्रूझ राईडचा आनंद घेण्यासाठी परदेशात जाण्याचीही गरज नाही. तुम्ही भारतातसुद्धा बजेटमध्ये लक्झरी क्रूझचा आनंद घेऊ शकता.

तुम्ही मुंबई ते गोवा दरम्यान फक्त 7000 रुपयांत क्रूझ राईड करू शकता. ही क्रूझ रत्नागिरी, मालवण, विजयदुर्ग, रायगड अशा ठिकाणी थांबून गोव्यात पोहोचते. दररोज संध्याकाळी 5 वाजता क्रूझ मुंबईहून उघडते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:00 वाजता गोव्याला पोहोचते. 8 रेस्टॉरंट आणि बार व्यतिरिक्त, अनेक दुकाने देखील क्रूझमध्ये आहेत. क्रूझमध्ये स्विमिंग पूल, आधुनिक लाउंज आणि मनोरंजन कक्ष आहे. हा क्रूज ईगल नावाची कंपनी चालवते. क्रूझमध्ये एकावेळी 500 प्रवासी प्रवास करतात.

एमवी महाबाहु क्रूज

जर तुम्हाला ईशान्य भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळाला एकत्र भेट द्यायची असेल, तर मग हा क्रूज ऑप्शन बेस्ट आहे, या क्रूझवर जा. या क्रूझचे मुख्य आकर्षण म्हणजे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि पीकॉक आयलंड आहे. या क्रूझवर तुम्ही 2 रात्रीपासून 7 रात्री पर्यंत प्रवास करू शकता. यासाठी वेगवेगळे पॅकेजेस आहेत, या क्रूझवर 2 लोकांसाठी 4 दिवस आणि 3 रात्रीचा खर्च 163800 रुपये आहे. जर तुमच्यासोबत एक मूल असेल तर तुम्हाला ₹ 25000 अतिरिक्त खर्च करावे लागतील.

कॉस्टा नियोक्लासिका क्रूज

मालदीवला जाण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. आता तुम्ही मालदीवला जाण्यासाठी क्रूझने गेलात तर किती रोमांचक अनुभव असेल याची कल्पना करा. प्रवासादरम्यान तुम्हाला एकापेक्षा एक सुंदर स्थळांचा आनंद लुटण्याची संधी मिळेल.कोस्टा क्रूझने भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून ३ ते ७ दिवसांचा क्रूझ प्रवास सुरू केला आहे. मुंबईपासून सुरू होणारा हा प्रवास तुम्हाला चार रात्री कोची आणि पुढील तीन रात्री मालदीवची राजधानी माले येथे घेऊन जातो. या क्रूझवर प्रवाशांना स्पा, कॅसिनो, जकूझी आणि चित्रपटगृहाची सुविधाही दिली जाते. या क्रूझवर 2 लोकांसाठी 8 दिवस आणि 7 रात्रीचा खर्च 1,43000 रुपये आहे.

ओबेरॉय मोटर व्हेसल वृंदा क्रूझ

ओबेरॉय मोटर व्हेसेल वृंदा क्रूझ केरळमधून चालते, तुम्हाला अतिशय आलिशान सहलीचा अनुभव येईल. या क्रूझमध्ये 5 स्टार हॉटेलच्या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. ती चालवण्यासाठी तुम्हाला 60 ते 70 हजार रुपये खर्च करावे लागतील. या क्रुझद्वारे तुम्हाला अलेप्पी ते वेंबनाड येथे नेले जाईल. प्रवासादरम्यान तुम्हाला केरळच्या बॅकवॉटरसह सुंदर नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेता येईल. (Tourism)

क्रूझवर सुट्टी एन्जॉय करण्याचे फायदे

तुम्हाला हॉटेलप्रमाणे पुन्हा पुन्हा चेक-इन आणि चेक-आउट करण्याचीही गरज नाही.

क्रूजचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला तुमचं लगेज सोबत घेऊन फिरण्याची आवश्यकता नसते. तुम्ही सहज सामानाशिवाय निवांत अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता.

त्यामुळे तुम्हाला बॅग्ज पुन्हा पुन्हा पॅक-अनपॅक करण्याचीही गरज नाही.

क्रूझवर एकदाच चेक इन करा आणि तुमची सुट्टी संपणार आहे तेव्हाच तुम्हाला चेक आउट करणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com