Ram Mandir Prasad Online Booking  eSakal
विज्ञान-तंत्र

Ayodhya Ram Mandir Prasad : घरबसल्या मिळणार अयोध्या राम मंदिरातील प्रसाद, तोही अगदी मोफत! असं करा ऑनलाईन बुकिंग

या कंपनीचे फाऊंडर आणि मालक आशिष सिंह यांनी याबाबत घोषणा केली आहे. ते म्हणाले की काही दिवसांपूर्वी त्यांना स्वप्नात श्री हनुमान यांनी दर्शन दिले होते.

Sudesh

Ayodhya Ram Mandir Prasad Online Booking : २२ जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापणा सोहळ्याला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. कित्येक लोक इच्छा असूनही या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र, या राम मंदिरातील प्रसाद तुम्हाला घरबसल्या मोफत मागवता येणार आहे. एका खासगी कंपनीने ही सोय उपलब्ध केली आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागणार आहे.

पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच देशभरातील नागरिकांना अशी विनंती केली आहे, की त्यांनी २२ जानेवारी रोजी अयोध्येत न येता आपल्या घरीच दिवाळी साजरी करावी. अशातच खादी ऑर्गेनिक नावाच्या एका कंपनीने राम मंदिरातील प्रसाद आपण घरोघरी पोहोचवणार असल्याचं घोषित केलं आहे. (PM Modi on Ayodhya Ram Mandir)

स्वप्नात आले हनुमान

या कंपनीचे फाऊंडर आणि मालक आशिष सिंह यांनी याबाबत घोषणा केली आहे. ते म्हणाले की काही दिवसांपूर्वी त्यांना स्वप्नात श्री हनुमान यांनी दर्शन दिले होते. हनुमानानेच त्यांना हा प्रसाद वाटण्यास सांगितलं. यानंतर आशिष यांनी हा निर्णय घेतला.

कंपनीचे लोक सर्व प्रसाद घेऊन मंदिरात जाणार आहेत. त्याठिकाणी विधिवत पूजा पार पाडल्यानंतर देशभरातील लोकांना हा प्रसाद पाठवण्यात येईल. यासाठी शिपरॉकेट किंवा अन्य डिलिव्हरी पार्टनर्सची मदत घेण्यात येणार आहे. (Private Firm to distribute Ram Mandir Prasad)

डिलिव्हरी चार्जेस द्यावे लागणार

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला हा प्रसाद घरबसल्या अगदी मोफत मिळू शकतो. कंपनी मंदिरातील प्रसादाचे कोणतेही शुल्क आकारणार नाही. मात्र, तुम्हाला डिलिव्हरीसाठी काही शुल्क द्यावे लागणार आहे. यासाठी केवळ ५१ रुपये डिलिव्हरी चार्जेस ठेवण्यात आले आहेत.

असा बुक करा प्रसाद

  • आपला प्रसाद ऑनलाईन बुक करण्यासाठी तुम्हाला आधी खादी ऑर्गेनिक कंपनीच्या वेबसाईटला (khadiorganic.com) भेट द्यावी लागेल.

  • याठिकाणी मुख्य स्क्रीनवरच फ्री प्रसाद हा पर्याय उपलब्ध आहे.

  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपला मोबाईल नंबर द्यावा लागेल.

  • डोअरस्टेप डिलिव्हरी हवी असेल, तर त्या पर्यायावर क्लिक करा. याठिकाणी पिकअप फ्रॉम डिस्ट्रिब्युशन सेंटर हा पर्यायही उपलब्ध आहे. हा पर्याय निवडल्यास तुम्हाला प्रसाद वाटप केंद्रावर स्वतःच जावं लागेल.

  • यानंतर आपला पत्ता, नाव आणि इतर गरजेची माहिती एंटर करा.

  • डिलिव्हरी चार्जेस पे केल्यानंतर तुमची ऑर्डर नोंदवली जाईल.

  • २२ जानेवारी नंतर यूजर्स आपली ऑर्डर ट्रॅक करू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT