Online Shopping esakal
विज्ञान-तंत्र

Online Shopping : ऑनलाइन शॉपिंग करताय? मग सावध राहा, अन्यथा होईल मोठं नुकसान

गेल्या दशकांत ऑनलाइन (Online Shopping) व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित झाला.

दिनेश कुडचे dineshkudache@yahoo.com

वेगवेगळी माहिती विचारण्याच्या बहाण्याने वेगवेगळी कागदपत्रे ते आपल्याकडून घेतात. आपण नकळत ती देत जातो.

गेल्या दशकांत ऑनलाइन (Online Shopping) व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित झाला. वेगवेगळ्या संकेतस्थळावरून ग्राहक वस्तू ऑर्डर देऊ लागले. डिलिव्हरी पार्सलद्वारे थेट घरापर्यंत वस्तू मिळू लागल्या. कुटुंबामध्ये कोणी ना कोणी ऑनलाइन ऑर्डर (Order Online) देतच असतो. संबंधित व्यक्ती घरी असेल अथवा नसेल, त्या वेळी घरातील दुसरी व्यक्ती ते डिलिव्हरी पार्सल घेऊन ठेवते. इथपर्यंतचा प्रवास आज शक्य झाला आहे, या नव्या ई-कॉमर्सच्या रुपाने. यात आता सायबर गुन्हेगारांनी धुमाकूळ घालायला सुरवात केली आहे. त्याविषयी...

सायबर गुन्हेगार (Cyber Criminals) तुम्हाला एका विशिष्ट क्रमांकावरून कॉल करतात. ‘तुमचे पार्सल मुंबई (Mumbai) येथे कस्टम ड्युटीच्या कस्टडीमध्ये आलेले आहे. तपासणीसाठी माहिती हवी आहे,’ असे सांगून आपली वैयक्तिक माहिती विचारली जाते. ‘ट्रू कॉलर’सारख्या ॲपवर देखील ही नावे खरी वाटतात. इथून त्यांचा फसवणुकीचा ‘ट्रॅप’ सुरू होतो. वेगवेगळी माहिती विचारण्याच्या बहाण्याने वेगवेगळी कागदपत्रे ते आपल्याकडून घेतात. आपण नकळत ती देत जातो.

आपण चुकीचा व्यवहार केला आहे, असं ते दर्शवतात. त्यासाठी आपणास दंड झाला आहे, असे सांगण्यात येते. हा दंड त्वरित न भरल्यास कारवाई होऊ शकते, अशी बतावणी केली जाते. या भीतीपोटी ग्राहक त्वरित बँकेमध्ये जाऊन दिलेल्या अकौंट पैसे जमा करतात. वेगवेगळे प्रश्‍न विचारून आपणास संमोहित केले जाते. आपण या जाळ्यात अडकत जातो. वारंवार धमकीचे कॉल येऊ लागतात. शेवटी आपणास ऑनलाइन फसवणूक झाल्याचे समजते. हे टाळण्यासाठी कोणतेही अनोळखी क्रमांकाचे कॉल्स घेण्याचे टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

१७ ऑक्टोबरला सूर्याचं राशीपरिवर्तन; मेष राशीसह ६ राशींचं नशीब पालटणार? मिळू शकतो मोठा फायदा

Marathi News Live Updates: 'लहरा दो तिरंगा' मोर्चाच्या १० मिनिटे आधी हायव्होल्टेज ड्रामा; अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

ना श्रीराम ना माधुरी; 'ही' आहे धकधक गर्लच्या घराची नेमप्लेट, फराह खानसुद्धा झाली अवाक

CJP Tiranga March : अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात; ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांची कारवाई, दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT