Women Abuse Case : प्रज्वल रेवण्णाविरुद्ध बलात्काराचा आणखी एक गुन्हा दाखल; खासदाराच्या अडचणी वाढल्या

प्रज्वलवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करणाऱ्या पीडितेला न्यायाधीशांसमोर हजर करून जबाब नोंदविण्यात आला.
JDS MP Prajwal Revanna
JDS MP Prajwal Revannaesakal
Summary

गृहमंत्रालयाने यापूर्वीच इंटरपोलच्या माध्यमातून १९६ देशांना आरोपींची सविस्तर माहिती दिली आहे. प्रज्वल या खटल्याला उपस्थित न राहिल्यास आणखी अडचणींना सामोरे जावे लागेल.

बंगळूर : महिलांवर लैंगिक अत्याचार (Women Abuse Case) आणि अश्‍लील व्हिडिओप्रकरणी खासदार प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्याविरोधात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हैसूरच्या के. आर. नगरात महिलेच्या अपहरणासह बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रज्वल रेवण्णा यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

JDS MP Prajwal Revanna
Kolhapur Lok Sabha : 'या' 40 गावांत ज्या उमेदवाराला मताधिक्य, त्याच उमेदवाराला लागणार विजयाचा गुलाल!

प्रज्वलवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करणाऱ्या पीडितेला न्यायाधीशांसमोर हजर करून जबाब नोंदविण्यात आला. तसेच त्या ठिकाणाची पाहणीही करण्यात आली. चन्नरायपट्टण येथील गनिकडा फार्महाऊसची पाहणी केली. सूत्रांनी सांगितले की, पीडित मुलगी गनिकडा येथे काम करत असताना प्रज्वलने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

JDS MP Prajwal Revanna
आता विधान परिषद निवडणुकीचे रणांगण; काँग्रेसला बहुमत मिळविण्याची संधी, 'इतक्या' जागांसाठी अधिसूचना जारी

प्रज्वलने खासदाराच्या अधिकृत सरकारी निवासस्थानी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. त्यामुळे सरकारी अधिकाराचा गैरवापर करून महिलेला ओलिस ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली प्रज्वलवर तिसरा एफआयआर (FIR) दाखल झाला आहे. एसआयटीने प्रज्वलला ३० एप्रिलपर्यंत सुनावणीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती.

मात्र, एक मे रोजी त्यांचे वकील अरुण जी. यांच्यामार्फत प्रज्वलने सात दिवसांचा वेळ मागितला होता. वकील अरुण यांनी एसआयटीकडे सात दिवसांचा वेळ मागितला होता. सात दिवसांचा अवधी देण्यास नकार देणाऱ्या एसआयटी अधिकाऱ्यांनी त्याला तातडीने हजर राहण्यास सांगितले. पण प्रज्वल हजर झाला नाही. आता हजर राहण्यास सांगितलेली मुदत संपली आहे.

JDS MP Prajwal Revanna
MPSC Exam : कृषी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; महिला प्रवर्गातून कागलच्या सायली फासके राज्यात प्रथम

प्रज्वल १५ मे रोजी येणार

गृहमंत्रालयाने यापूर्वीच इंटरपोलच्या माध्यमातून १९६ देशांना आरोपींची सविस्तर माहिती दिली आहे. प्रज्वल या खटल्याला उपस्थित न राहिल्यास आणखी अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यामुळे प्रज्वल १५ मे रोजी मध्यरात्री बंगळूरला येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची माहिती केम्पेगौडा विमानतळ पोलिस अधिकाऱ्यांना दिली आहे. प्रज्वल १५ मे रोजी फ्लाइट एलएच ७६४ ने येणार असल्याची माहिती आहे. हे तिकीट जर्मनीतील म्युनिक विमानतळावरून बुक केल्याची माहिती इमिग्रेशन विभागाकडून पोलिसांना मिळाली. प्रज्वल याने दोनदा तिकीट बुक करून रद्द केले होते. १५ मे रोजी एलएच ७६४ म्युनिक ते बंगळूर असा प्रवास करणार आहे आणि रात्री १२-३० वाजता बंगळूर टर्मिनल-२ वर पोहोचेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com