C-DAC sakal
विज्ञान-तंत्र

C-DAC : ‘सीडॅक’कडून गुढीपाडव्याला शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्टफार्म’ची अनोखी भेट, काय आहेत वैशिष्ट्ये ?

प्रगत संगणन विकास केंद्र अर्थात सी-डॅक आपल्या स्थापनादिनी अर्थात गुढीपाडव्याला शेतकऱ्यांसाठी एक अनोखी भेट घेऊन येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रगत संगणन विकास केंद्र अर्थात सी-डॅक आपल्या स्थापनादिनी अर्थात गुढीपाडव्याला शेतकऱ्यांसाठी एक अनोखी भेट घेऊन येत आहे. बदलते हवामान, तापमान, आद्रता, पाऊस, मृदा परीक्षणाच्या सूचना आणि उपयोजनात्मक माहिती देणाऱ्या स्मार्टफार्मचे अनावरण करण्यात येणार आहे.

पाषाण येथील भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) सभागृहात मंगळवारी (ता. ९) ‘सीडॅक’चा ३७वा स्थापना दिवस साजरा होणार आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजता कार्यक्रमाची सुरवात होणार आहे.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशिष लेले, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव भूवनेश कुमार, ‘सीडॅक’चे महासंचालक ई मंगेश आणि मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमातच या प्रणालीचे अनावरण करण्यात येणार असून ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी संसाधनांचा वापर करून अधिक कार्यक्षम उत्पादन करण्यास मदत करणार आहे. स्मार्ट शेतीमुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन वाढवता येते त्यांचा खर्च कमी होतो आणि पर्यावरण सुधारण्यासही मदत होईल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे

वैशिष्ट्ये

  • तापमान, आद्रता, मृदेतील पोषण मूल्यांचे संवेदकामार्फत नोंदणी

  • वर्षभराच्या पाण्याचे आणि खतांचे पूर्वनियोजन करता येणार

  • टच स्क्रीनद्वारे शेतकऱ्यांना उत्तम माहिती मिळते

  • स्वयंचलित पद्धतीने आणि रिमोट कंट्रोलद्वारे वापरता येतो

  • मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे माहिती मिळते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : संजू सॅमसनची अविस्मरणीय खेळी... वंदे मातरम्... सूर्यकुमार यादवचा कुर्निसात... अंगावर शहारा आणणारा Video

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

Sanju Samson Reaction : देवाची कृपा! संजू सॅमसन भावनिक झाला; सेलिब्रेशन, देवाचे आभार अन् म्हणाला, विराट, रोहित यांनी...

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

SCROLL FOR NEXT