Vehicle Sales : वाहनविक्रीत तीन टक्के वाढ ; इलेक्ट्रिक दुचाकींचा हिस्सा ९.१२ टक्क्यांवर

देशांतर्गत बाजारपेठेत मार्च महिन्यात २१ लाख २७ हजार १७७ वाहनांची विक्री झाली असून, त्यात वार्षिक ३.१४ टक्के वाढ झाली आहे.
Vehicle Sales
Vehicle Salessakal

मुंबई : देशांतर्गत बाजारपेठेत मार्च महिन्यात २१ लाख २७ हजार १७७ वाहनांची विक्री झाली असून, त्यात वार्षिक ३.१४ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये २० लाख ६२ हजार ४०९ वाहनांची विक्री झाली होती. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल असोसिएशनने (फाडा) आज ही आकडेवारी प्रसिद्ध केली.

मार्चमध्ये सर्वाधिक १७.१३ टक्के वाढ तीनचाकी वाहनांच्या विक्रीत झाली आहे. गेल्या महिन्यात देशभरात एकूण एक लाख पाच हजार २२२ तीनचाकी वाहनांची विक्री झाली. मार्च २०२३ मध्ये ती ८९,८३७ होती. व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत वार्षिक ५.८७ टक्क्यांनी घट झाली आहे. दुचाकी वाहनांच्या श्रेणीमध्ये पाच टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतही वाढ दिसून आली, इलेक्ट्रिक दुचाकींचा बाजारहिस्सा प्रथमच ९.१२ टक्क्यांवर गेला असल्याचे ‘फाडा’ने म्हटले आहे.

प्रवासी वाहनांची विक्री मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत दोन टक्के आणि गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत सहा टक्के विक्री घटली आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये मार्च महिन्यात मारुती सुझुकीने सर्वाधिक १.२६ लाख मोटारींची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने १.३९ लाख मोटारींची विक्री केली होती.

आर्थिक वर्ष २०२४ मैलाचा दगड

आर्थिक वर्ष २०२४ प्रवासी वाहनांसाठी मैलाचा दगड ठरले. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एकूण दोन कोटी ४५ लाख ३० हजार ३३४ वाहनांची विक्री झाली. हा आकडा मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १०.२९ टक्के अधिक आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एकूण दोन कोटी २२ लाख ४१ हजार ३६१ वाहनांची विक्री झाली, असेही ‘फाडा’ने म्हटले आहे.

Vehicle Sales
Share Market and Election : शेअर बाजाराला मतदानानिमित्त सुट्टी

दुचाकी वाहनांमध्ये नऊ टक्के, तीनचाकी वाहनांमध्ये ४९ टक्के, प्रवासी वाहनांमध्ये ८.४५ टक्के, ट्रॅक्टरमध्ये आठ टक्के आणि व्यावसायिक वाहनांमध्ये पाच टक्के वाढ झाली. वाहन उपलब्धतेतील वाढ, नवी मॉडेल धोरणात्मक विपणन प्रयत्न, दर्जेदार रस्त्यांचा विस्तार यांचे यात लक्षणीय योगदान आहे, असे ‘फाडा’ने म्हटले आहे.

आर्थिक चिंता, निवडणुकीतील अनिश्चितता आणि तीव्र स्पर्धा यामुळे प्रवासी वाहनांच्या विक्रीवर परिणाम जाणवला. मात्र, बाजारातील अस्थिरता, तीव्र स्पर्धेचा सामना करूनही उद्योग धोरणात्मकदृष्ट्या विकसित होत आहे, विशेषत: प्रीमियम व इलेक्ट्रिक वाहनांचे भविष्य उज्ज्वल दिसत आहे.

- मनीष राज सिंघानिया, अध्यक्ष, फाडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com