Chandrayaan 3 
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 च्या लँडिंगच्या चार महिन्यांनंतर आनंदाची बातमी! ISRO ला मोठे यश

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले अंतराळ यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.

Sandip Kapde

Chandrayaan 3: भारताच्या चांद्रयान - ३ ने चार महिन्यांपूर्वी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँडिंग करुन इतिहास रचला होता. यामुळे भारताचे जगात कौतुक झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले अंतराळ यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. दरम्यान आता चार महिन्यांनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

चांद्रयान-3 मोहिमेसाठी इस्रोला प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ISRO च्या चांद्रयान-3च्या यशस्वी मोहिमेसाठी आइसलँडमधील हुसाविक येथे असलेल्या 'एक्सप्लोरेशन म्युझियम' द्वारे '2023 लीफ एरिक्सन  लूनर प्राइज' देऊन सन्मानित करण्यात आले आहे. रेकजाविकमधील (Reykjavik) भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे याची माहिती दिली.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळ यानाचे पहिले 'सॉफ्ट-लँडिंग' आणि "चंद्राच्या शोधात प्रगती करण्यासाठी आणि खगोलीय रहस्ये समजून घेण्यात इस्रोच्या प्रयत्नाचा पुरस्काराने सन्मान केला, असे  रेकजाविकमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे.

पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी आभार मानले. त्यांनी एक व्हिडिओ संदेश पाठवला आणि भारताच्या अंतराळ संस्थेच्या वतीने राजदूत बी श्याम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 'लीफ एरिक्सन पुरस्कार' हा २०१५ पासून एक्सप्लोरेशन म्युझियमद्वारे दिला जाणारा वार्षिक सन्मान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT