S. Somnath Autobiography
S. Somnath AutobiographyeSakal

S. Somnath Autobiography : इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांचा प्रेरणादायी प्रवास समोर; आत्मचरित्र झालं प्रकाशित

हे पुस्तक केरळमधील लिपी पब्लिकेशन्सने प्रकाशित केले असून, नोव्हेंबर महिन्यात ते वाचकांच्या भेटीला येणार आहे.
Published on

चांद्रयान-३, आदित्य एल-१ आणि आता येऊ घातलेलं गगनयान. इस्रोच्या या सर्व भव्य-दिव्य मोहिमा यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, ते इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांचा खडतर प्रवास आता जगासमोर आला आहे. सोमनाथ यांचं आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आलं आहे.

सोमनाथ यांचे ‘निलावू कुडीचा सिम्हांगल’ (चंद्रप्रकाश प्यायलेला सिंह) या शीर्षकाचे आत्मचरित्र मल्याळी भाषेत आहेत. हुशार, पण आत्मविश्‍वासाचा नसणाऱ्या युवकांना प्रेरित करण्यासाठीचा प्रयत्न या आत्मकथनातून केला आहे, असे सोमनाथ म्हणाले.

S. Somnath Autobiography
Gaganyaan Mission: चंद्र-सूर्य मोहिमेनंतर गगनयानची तयारी, चांद्रयानापेक्षा गगनयानचा खर्च आहे 14 पट जास्त

महाविद्यालयात शिकताना वाहतूक आणि वसतिगृहाचा खर्च वाचविण्यासाठी काटकसरीचे आयुष्य जगताना एका जुन्या सायकलची साथ त्यांना होती. अडचणींचा सामना करताना कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या सामर्थ्यावर त्यांनी केलेल्या वाटचालीचा आढावा या पुस्तकातून घेतला आहे.

पुढील महिन्यात उपलब्ध होणार

एस.सोमनाथ यांच्या नेतृत्वाखालील भारताची ‘चांद्रयान-३’ मोहीम यशस्वी ठरली. याचे प्रतिबिंब या आत्मकथेत उमटले आहे. ‘चांद्रयान-३’नंतर लगेचच ‘आदित्य -एल१’ ही सौर मोहीम हाती घेण्यात आली तर गेल्याच आठवड्यात देशाची महत्त्वाकांक्षी मानवी अवकाश मोहिमेसाठी पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आली. या व्यग्रतेतूनही सोमनाथ यांनी त्यांचा जीवनाची कथा सांगण्यासाठी वेळ काढला आहे. हे पुस्तक केरळमधील लिपी पब्लिकेशन्सने प्रकाशित केले असून, नोव्हेंबर महिन्यात ते वाचकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com