China Shenzhou-17 eSakal
विज्ञान-तंत्र

China Shenzhou-17 : चीनने अंतराळात पाठवले आतापर्यंतचे सर्वात तरुण अवकाशवीर, स्पेस स्टेशनवर झाले दाखल; पाहा व्हिडिओ

२०३० सालापर्यंत आपल्या अवकाशवीरांना चंद्रावर उतरविण्याचे चीनचे नियोजन आहे.

Sudesh

बीजिंग : चीनच्या ‘शेन्झोऊ १७’ या अवकाश यानाने आज गोबीच्या वाळवंटात असलेल्या प्रक्षेपण केंद्रावरून चिनी अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले. ‘लाँग मार्च २ एफ’ या प्रक्षेपकाद्वारे उड्डाण केलेल्या या अवकाश यानाच्या माध्यमातून चीनने त्यांचे अवकाशवीरांचे आतापर्यंतचे सर्वांत तरुण पथक पाठविले आहे.

२०३० सालापर्यंत आपल्या अवकाशवीरांना चंद्रावर उतरविण्याचे चीनचे नियोजन आहे. त्या दृष्टीने ते अनेक तरुण अवकाशवीरांची तयारी करून घेत असल्याचे दिसून आले. आजच्या मोहिमेत सहभाग घेतलेल्या तीन अवकाशवीरांचे सरासरी वय ३८ आहे. हे तिघे जण मागील सहा महिन्यांपासून अवकाशस्थानकात असलेल्या तीन अवकाशवीरांची जागा घेतील.

उड्डाणानंतर काही तासांमध्येच हे अवकाशवीर चीनच्या स्पेस स्टेशनवर पोहोचले. शिनुआ न्यूजच्या एक्स हँडलवरुन एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती देण्यात आली.

विश्‍वाचा अभ्यास करण्यासाठी एक नवीन दुर्बीण अवकाशात पाठविणार असल्याचेही चीनच्या अवकाश संशोधन संस्थेने आज जाहीर केले. अवकाश गंगांचे निरीक्षण आणि त्यांचा नकाशा तयार करण्याचे काम ही दुर्बीण करेल, असे सांगण्यात आले. मात्र, दुर्बीण कधी सोडणार, ते जाहीर करण्यात आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update: पुढील चार दिवसांत पाऊस कसा असेल? हवामान विभागाने दिला अंदाज

SSC HSC Supplementary Result : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी होणार जाहीर

ST Bus: पंढरपूर वारीसाठी एसटीची धाव! राज्यभर ५५०० विशेष बसचे नियोजन; महिलांना ५०% सवलत, तर 'या' प्रवाशांना मोफत प्रवास

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात; पहिल्या पंच साक्षीदाराची साक्ष नोंदविली

IND vs ENG: 'T20 मालिकेतील पराभवाचा वनडेवर परिणाम नाही, कारण...', कर्णधार गिल स्पष्टच बोलला; २०२७ वर्ल्ड कपचीही सांगितली योजना

SCROLL FOR NEXT