Do you know about this feature of WhatsApp Nagpur news
Do you know about this feature of WhatsApp Nagpur news 
विज्ञान-तंत्र

WhatsApp वर असे सेव्ह करा फोटो, व्हिडिओ आणि मेसेज; ही आहे सोपी पद्धत

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : आजच्या घडीला प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आलेला आहे. तसेच प्रत्येकजण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करीत आहे. व्हॉट्सअ‍ॅप कोणत्याही वस्तूच्या देवाणघेवाणीचा सोपा मार्ग झाला आहे. याद्वारे आपण फोटो, व्हिडिओ, डॉक्यूमेंट दुसऱ्याला सेंड करू शकतो. तसेच चॅट करू शकतो. आता सात दिवसांपूर्वीचे मेसेच आपोआप डिलिट करण्याची सुविधा व्हॉट्सअ‍ॅप दिली आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप घेऊन आलाय काही मेसेज सेव्ह करून ठेवणारे फीचर... या फीचरद्वारा तुम्ही आपले मेसेच सेव्ह करून ठेवू शकता आणि गरज पडल्यास परत मिळवू शकता.

अनेकदा आपण आपल्याला आवश्यक असलेले फोटो, व्हिडिओ, टेक्स किंवा आवश्यक मेसेज घरच्या व्यक्तींना पाठवून ठेवतो. म्हणजे गरज पडल्यास ते आपल्याला परत मिळवता येईल किंवा सहज उपलब्ध होईल. मात्र, ते कधी कधी आपल्याला आठवत नाही. यामुळे आपली मोठी अडचण होते. म्हणजे हे आपण लिहून विसरल्यासारखे होते.

आपण एखादी आवश्यक गोष्ट एखाद्या कागदावर किंवा वहीत लिहून ठेवतो. जेणे करून गरज पडल्यास ते आपल्याला परत मिळवता येईल. मात्र, तो कागद काम पडते त्यावेळेस मिळत नाही. यामुळे आपल्याला नानाविध समस्यांचा सामना करावा लागतो. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आपण आपली ही समस्या सोडवू शकतो. आपल्याला स्वतःला व्हॉट्सअ‍ॅपवरही चॅट करायचे असेल तर यासाठी दोन मार्ग आहेत. आपण आपल्या स्मार्टफोन किंवा संगणकाद्वारे आपल्या सोयीनुसार कोणतीही पद्धत निवडू शकता. चला तर जाणून घेऊया या पर्यायाविषयी...

ही आहे पद्धत

सर्वप्रथम स्मार्टफोन किंवा संगणकावर कोणतेही वेब ब्राउझर उघडा. यानंतर अ‍ॅड्रेस बारमध्ये http://wa.me/च्या पुढील देश कोडसह आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा आणि मग शोधा. उदा. http://wa.me/+91987****798. हे करताच एक स्वतंत्र वेबपृष्ठ उघडेल आणि आपल्या देशाचा कोड असलेला आपला मोबाइल नंबर दिसेल.

त्याच्याखाली टॅप टू शेअर हा पर्याय दिसेल. आपण मोबाईलचा वापर करीत असाल तर यावर क्लिक करा. क्लिक करताच व्हॉट्सॲप आपल्या स्वतःच्या चॅटसह उघडेल. परंतु, हे संगणकावरून करीत असाल तर प्रथम आपल्याला व्हॉट्सॲप वेबवर लॉग इन करावे लागेल. तुमची चॅट उघडताच तुम्हाला तुमचा नंबर वर दिसेल.

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT