esakal | भावी वकिलाने केला बलात्कार अन् आई-वडील म्हणाले, ‘पैसे घ्या आणि मोकळे व्हा’
sakal

बोलून बातमी शोधा

Future lawyer tortures student Nagpur crime news

मृणालने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो दुसऱ्या दिवशीही घरी आला. त्याने पुन्हा तीच मागणी केली. रियानेही लग्न करणार असल्यामुळे नकार दिला नाही. तेव्हापासून मृणाल वाटेल तेव्हा घरी यायला लागला.

भावी वकिलाने केला बलात्कार अन् आई-वडील म्हणाले, ‘पैसे घ्या आणि मोकळे व्हा’

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : वकिलीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने बारावीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार केला. तरुणीच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी युवकाला अटक केली. मृणाल चंद्रशेखर राऊत (२२, रा. वर्धमाननगर) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृणाल राऊत हा एलएलबीचे शिक्षण घेत आहे. तो श्‍वानप्रेमी असून त्याच्याकडे चार वेगवेगळ्या प्रजातीचे श्‍वान आहेत. तर १९ वर्षीय तरुणी रिया (बदललेले नाव) ही सुद्धा श्‍वानप्रेमी असून तिच्याकडे तीन श्‍वान आहेत. तिचे वडील प्रॉपर्टी डीलर आहे. कुत्र्यांसाठी असलेल्या सलूनमध्ये मृणाल आणि रियाची ओळख झाली. सलूनचे प्रशिक्षण घेण्यासाठी रिया प्रशिक्षण केंद्रात दोघे भेटायला लागले.

लग्नाच्या अठराव्या दिवशी पत्नीने दिला जेवणाचा डब्बा; सायंकाळी घरी परतल्यानंतर पतीच्या पायाखालची जमीनच सरकली

कुत्र्यांना ट्रेनिंग देण्याच्या बहाण्याने मृणालने रियाचा मोबाईल क्रमांक घेतला. दोघांचीही चॅटिंग सुरू झाली. मृणालने तिच्याशी मैत्री केली आणि नंतर प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. ८ मार्चला सायंकाळी तो रियाच्या घरी आला. त्याने कुत्र्यांना ट्रेनिंग दिली आणि घरी कुणीही नसल्याची संधी साधत शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिला. मात्र, त्याने लग्न करायचे असेल तर शारीरिक संबंध ठेवावे लागतील अशी अट घातली. लग्नाच्या आमिषाला रिया बळी पडली.

मृणालने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो दुसऱ्या दिवशीही घरी आला. त्याने पुन्हा तीच मागणी केली. रियानेही लग्न करणार असल्यामुळे नकार दिला नाही. तेव्हापासून मृणाल वाटेल तेव्हा घरी यायला लागला. तिलाही बाहेर नेत होता. रियाने आई-वडिलांशी प्रेमप्रकरणाबाबत चर्चा केली. त्यांनी होकार दिली. त्यामुळे तिने लगेच मृणालला फोन केला आणि भेटायला गेली. त्याने लग्न करण्यास चक्क नकार दिला. त्यामुळे रिया संतापली. तिने त्याच्याशी भांडण केले. आई-वडिलांनाही झालेला प्रकार सांगितला.

अधिक माहितीसाठी - पत्नीनेच केला पतीचा भंडाफोड : अनाथ मुलास वाईट दृश्‍य बघण्यास करायचा बाध्य

पैसे घ्या अन् मिटवा

रियावर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्यानंतर मृणालने लग्नास नकार दिला. त्यामुळे रिया आई-वडिलांसह मृणालच्या घरी गेली. त्याच्या आई-वडिलांनीही लग्नास नकार दिला. ‘तुम्हाला काय ते पैसे लागतील ते घ्या आणि मोकळे व्हा’ अशी भाषा वापरली. त्यामुळे चिडलेल्या रियाने थेट कळमना पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. पोलिसांनी मृणालवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि अटक केली.

go to top