Electric Vehicle  esakal
विज्ञान-तंत्र

Electric Vehicle : इलेक्ट्रिक वाहने चार्ज करताना या 3 चुका टाळा, नाहीतर गाडी पेट घेईल

ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे

Anuradha Vipat

Electric Vehicle : ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. त्यामुळे सरकार देखील EVs ला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटनाही सातत्याने समोर येत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहन असेल, मग ते कार असो किंवा स्कूटर किंवा बाईक, अशा काही चुका आहेत ज्या तुम्ही बॅटरी चार्ज करताना टाळल्या पाहिजेत.

ओव्हरचार्ज करणं पडू शकतं महाग

ओव्हरचार्जिंग बॅटरीच्या लाईफसाठी अजिबात चांगलं नाही, मग ती फोनची असो किंवा तुमच्या इलेक्ट्रिक वाहनाची. जेव्हा तुम्ही तुमचे इलेक्ट्रिक वाहन पुढील वेळी चार्ज कराल, तेव्हा तुमचे इलेक्ट्रिक वाहन 100 टक्के चार्ज झाल्यानंतरही चार्जिंग काढण्यास विसरू नका. बॅटरी सतत चार्ज केल्याने बॅटरीवरही वाईट परिणाम होतो, अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी ओव्हरचार्ज करण्याची चूक टाळली पाहिजे.

बॅटरी पूर्णपणे संपू देऊ नका...

इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी पूर्णपणे ड्रेन झाल्यानंतर कधीही चार्ज करू नका, असं केल्याने बॅटरीवर परिणाम होतो. जेव्हा बॅटरी 20 टक्के राहते तेव्हा चार्ज करणे योग्य आहे.

राईडनंतर लगेच करू नका चार्ज

इलेक्ट्रिक वाहनात दिलेली लिथियम आयन बॅटरी उष्णता निर्माण करते. या प्रकरणात, बॅटरी थंड झाल्यानंतरच बॅटरी चार्ज करावी. वाहन चालविल्यानंतर लगेचच इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी चार्ज करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT