Technology Tips : फक्त 2999 रुपये भरून घ्या Samsung Galaxy M53, फोनमध्ये मिळेल 108MP कॅमेरा

अगदी कमीत कमी पैसे भरून तुम्ही Samsung Galaxy M53 खरेदी करू शकता
Technology Tips
Technology Tipsesakal

Samsung Galaxy M53 Discount : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल पण तुमचं बजेट नसेल तर तुमच्याकडे एक चांगली ऑफर आहे. अगदी कमीत कमी पैसे भरून तुम्ही Samsung Galaxy M53 खरेदी करू शकता आणि तेही अगदी सहज. शिवाय या स्मार्टफोनच्या खरेदीवर अनेक ऑफर्सचा लाभ मिळेल. यामध्ये अनेक बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील समाविष्ट आहेत. पण हा फोन खरेदी कसा करायचा? तर हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Technology Tips
Health Tips : थायरॉईड दूर ठेवायला मदत करतील या बिया; रोज खा आणि फिट रहा

Samsung Galaxy M53 ची मूळ किंमत आहे 32,999 रुपये. पण तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून 21 टक्के सूट मिळवून हा फोन तुम्हाला 25,999 रुपयांना मिळू शकतो. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला हा व्हेरिएंट Amazon वर कमी किमतीत उपलब्ध आहे. याशिवाय, तुम्ही या स्मार्ट फोनवर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता.

Technology Tips
Technology Tips : आता फेसबुक-इन्स्टाग्रामवर अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी भरावे लागणार पैसे

Samsung Galaxy M53: Amazon Deal

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून 21 टक्के सूट देऊन Samsung Galaxy M53 खरेदी करण्याची संधी आहे. याशिवाय तुम्ही यावर एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकता. एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला जुन्या फोनच्या बदल्यात 23,000 हजार रुपयांचा फायदा मिळेल. तुमच्या फोनची एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या स्मार्टफोनची स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असते.

Technology Tips
Technology Tips : एअरटेलच्या या प्लॅनमध्ये मिळेल अनलिमिटेड डेटा शिवाय Disney Plus Hotstar चं मोफत सबस्क्रिप्शन

एक्सचेंज व्हॅल्यूचा फायदा घेतल्यानंतर तुम्हाला हा स्मार्टफोन फक्त 2,999 रुपयांमध्ये मिळत आहे. याशिवाय, ग्राहकांच्या सोयीसाठी, तुम्हाला या स्मार्टवर EMI चा ऑप्शन देखील मिळत आहे. यासाठी 1,242 रुपये (प्रायमरी पेमेंट) मंथली पेमेंट करावे लागेल.

Technology Tips
Tata Altroz CNG And Punch CNG : आता टाटा पंच आणि अल्ट्रोझ येणार इलेक्ट्रिक-सीएनजी अवतारात

Samsung Galaxy M53: फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 900 chipset ने सुसज्ज आहे. कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचं झाल्यास यात तुम्हाला क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल. यामध्ये प्राइमरी कॅमेरा 108 मेगापिक्सल, सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओग्राफीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 32-मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com