Auto Sector Layoffs 
विज्ञान-तंत्र

Auto Sector Layoffs : IT नंतर आता ऑटो सेक्टरमधील 'ही' मोठी कंपनी कर्मचाऱ्यांना देणार नारळ

सकाळ डिजिटल टीम

Ford Layoffs : नवीन वर्षात आयटी क्षेत्रात मोठी नोकरकपात सुरु आहे. फेसबुक, ट्विटर, गुगल, अ‍ॅमेझॉनने अनेकांना नारळ दिला आहे. आता ऑटो सेक्टरमध्ये देखील नोकरकपात करण्यात येत आहे. यापूर्वी, Amazon आणि Meta सारख्या अनेक दिग्गज कंपन्यांनी त्यांच्या कंपनीत मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केली आहे. दरम्यान अमेरिकन कार उत्पादक फोर्डने देखील नोकरकपातीची घोषणा केली आहे. 

फोर्ड मोटर कंपनी ३ हजार २०० कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. यासोबतच कंपनीने काही प्रोडक्ट डेव्हलपमेंटचे काम अमेरिकेत हलवण्याची योजना आखली आहे. ही कंपनी मुळ अमेरीकेची आहे. इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि या दिशेने काम करण्यासाठी फोर्डने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. 

आयजी मेटल युनियनने सोमवारी वर्क कौन्सिलच्या बैठकीनंतर यावर आपली भूमिका मांडली. या नोकरकपातीचा युरोपमधील अंदाजे ६५% विकास नोकऱ्यांवर परिणाम होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच या विरुद्ध ते लढा देतील असे देखील स्पष्ट केले. 

फोर्ड कंपनी युरोपमध्ये सुमारे ४५ हजार लोकांना रोजगार देते. कंपनीची आता ७ नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स आणण्याची तयारी करत आहे. जर्मनी आणि तुर्कस्तानमध्ये इलेक्ट्रिक मॉडेल्सचे उत्पादन करण्यात येऊ शकते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Protest : PM निवासस्थानाबाहेर घातपात करायचा होता का?; एकनाथ शिंदेंनी 'या' दोन माजी पंतप्रधानांचा दाखला देत राहुल गांधींवर डागली तोफ

Raigad Protest: पालीत जंतरमंतर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन; विद्यार्थी समर्थनार्थ नागरिकांची मोठी एकजूट

Latest Marathi Update : 'युवकांच्या भविष्यासाठी राजकारण नको; चर्चेत अडथळे आणू नका', सर्व पक्षांना किरेन रिजिजू यांचे आवाहन

IND vs ZIM : इतिहास फक्त 16 धावा दूर; पण शून्यावर बाद झाला तर अभिषेकच्या नावावर नकोसा विक्रम

Pune News: हवेलीत धक्कादायक प्रकार! ‘मुळा-मुठा’वरील २४ कोटींचा पूल पहिल्याच पुरात कोसळला; पीएमआरडीएच्या कामावर प्रश्नचिन्ह..

SCROLL FOR NEXT