Gmail New Feature eSakal
विज्ञान-तंत्र

Gmail : महत्त्वाचे ई-मेल होतायत मिस? जी-मेलमध्ये बदला फक्त एकच सेटिंग; होईल मोठा फायदा

Gmail White List : महत्त्वाचे ई-मेल मिस झाले, तर ते बरंच महागात पडू शकतं.

Sudesh

आजकाल बरेचसे व्यवहार आणि महत्त्वाच्या गोष्टी ई-मेलच्या माध्यमातून बोलल्या जातात. कित्येक वेळा स्पर्धा-परीक्षांचे वेळापत्रक, हॉल तिकीट किंवा इंटरव्ह्यूचा कॉल हादेखील इमेलच्या माध्यमातून येतो. यामुळेच महत्त्वाचे ई-मेल मिस झाले, तर ते बरंच महागात पडू शकतं.

कित्येक जणांना असा अनुभव आला आहे, की एखाद्या कंपनीने पाठवलेला महत्त्वाचा मेल थेट स्पॅममध्ये गेला आहे. तुम्हालाही असा अनुभव आला असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे कामाचे ई-मेल्स कधीही स्पॅममध्ये जाणार नाहीत.

सेफ लिस्टिंग फीचर

जी-मेलमध्ये एक 'सेफ लिस्टिंग' फीचर मिळतं. यामध्ये तुम्ही जेव्हा एखादा वेब अ‍ॅड्रेस किंवा ई-मेल आयडी देता, तेव्हा त्यावरुन आलेला मेल स्पॅममध्ये न जाता, थेट प्रायमरी मेलबॉक्समध्ये येतो. सेफ लिस्टिंगला 'व्हाईट लिस्टिंग' असंही म्हटलं जातं. तुम्ही यामध्ये जो वेब अ‍ॅड्रेस दिला आहे, तो सुरक्षित आहे असं जी-मेल समजतो. त्यामुळे त्यावरुन आलेले ई-मेल्स स्पॅममध्ये जात नाहीत.

अशी करा सेटिंग

सेफ लिस्टिंगमध्ये एखादा मेल आयडी अ‍ॅड करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला Gmail अ‍ॅप उघडावं लागेल. यामध्ये सेटिंग्समध्ये जाऊन 'All Settings' हा पर्याय निवडा. यामध्ये 'फिल्टर अँड ब्लॉक्ड अ‍ॅड्रेस' यावर क्लिक करा.

यानंतर क्रिएट न्यू फिल्टर हा ऑप्शन निवडा. यामध्ये तुम्ही विचारलेली माहिती भरून नवीन फिल्टर तयार करू शकाल. यानंतर 'क्रिएट फिल्टर' पर्यायावर क्लिक केल्यास तुमच्यासमोर आणखी एक पॉप-अप येईल. यात 'नेव्हर सेंड टू स्पॅम' असा पर्याय निवडा. हा फिल्टर सर्व चॅट्सवर लागू करा, ज्यामुळे जुने ई-मेल्स देखील सेफ लिस्टमध्ये येऊ शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलीच्या प्रेमविवाहाचा राग; तरुणाला बेदम मारहाण, जळत्या चितेवर फेकून दिलं...

Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक कुटुंबासाठी स्वतःची स्वप्नं ठेवतात बाजूला; पण नशीब त्यांना उशिरा का होईना देतं मोठं फळ

Ambad Pachod Naka fire: अंबडच्या पाचोड नाक्यावर विजेच्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; पाच दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान

Dhoregaon banned gutkha seizure: ढोरेगावमध्ये ५.२२ लाखांचा बंदी गुटखा-जर्दा साठा जप्त; पाचांवर गुन्हा, दोघांना अटक

शनिवार-रविवार असून चिखलदऱ्यात गर्दी नाही, पर्यटकांनी फिरवली पाठ, अनेक पॉईंटवर शुकशुकाट, पण कारण काय?

SCROLL FOR NEXT