iPhone 15 Features : लाँचची तारीख जाहीर झाली अन् काही तासांतच 'आयफोन 15' चे फीचर्स लीक! जाणून घ्या

Apple iPhone 15 Series : हे स्मार्टफोन कसे असतील आणि यामध्ये कोणते फीचर्स असू शकतात याबाबत लोक भरपूर उत्सुक आहेत.
iPhone 15 Features
iPhone 15 FeatureseSakal

iPhone 15 Ultra : अ‍ॅपल कंपनीने बुधवारी आपल्या यावर्षीच्या आपल्या इव्हेंटची तारीख जाहीर केली. 12 सप्टेंबरला होणाऱ्या या इव्हेंटमध्ये अ‍ॅपल आपली बरीच उत्पादने लाँच करणार आहे. मात्र यातील मुख्य आकर्षण असेल, आयफोन-15 सीरीज. या सीरीजमध्ये आयफोन-15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 अल्ट्रा याचा समावेश असेल.

हे स्मार्टफोन कसे असतील, आणि यामध्ये कोणते फीचर्स असू शकतात याबाबत लोक भरपूर उत्सुक आहेत. मात्र, या सगळ्यातच 'आयफोन 15 अल्ट्रा' याची अधिक चर्चा सुरू आहे. अ‍ॅपल आतापर्यंत आपल्या सीरीजमधील मोठ्या आयफोनला 'प्रो मॅक्स' असं नाव देत आलं आहे. मात्र iPhone 15 पासून हे बदलून, iPhone 15 Ultra असा सगळ्यात मोठा आयफोन असेल, असं बोललं जात आहे.

iPhone 15 Features
iPhone Settlement : 'या' आयफोन यूजर्सना कंपनी देणार तब्बल 5 हजार रुपये! जुन्या खटल्याच्या निकालानंतर कोर्टाने दिले निर्देश

'iPhone 15 Ultra' मध्ये कोणते फीचर्स असू शकतात, याबाबत माहिती आता लीक झाली आहे. अ‍ॅपल लीकर नावाच्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन ही माहिती पोस्ट करण्यात आली आहे. अर्थात, ही माहिती अधिकृत नाही. मात्र, ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कॅमेऱ्यामध्ये मोठा अपग्रेड

या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आयफोन 15 अल्ट्राच्या कॅमेऱ्यात मोठा अपग्रेड मिळू शकतो. यामध्ये असणाऱ्या 48MP मुख्य कॅमेऱ्यामध्ये विविध प्रकारच्या आठ लेन्स असू शकतात. तसंच, यामध्ये 6X किंवा 10X झूम असणारा पेरिस्कोप कॅमेराही दिला जाऊ शकतो. यासोबतच, यात ड्युअल सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर बॅक कॅमेरा हा 8K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करेल.

iPhone 15 Features
Apple AirPods : आता संपूर्ण जगात मिळतील 'मेड इन इंडिया' एअरपॉड्स! हैदराबादमध्ये होणार उत्पादन, अ‍ॅपलचा मोठा निर्णय

डिझाईन

या फोनमध्ये टायटेनियम फ्रेम देण्यात येईल. याचे बेझल्स 1.55mm एवढे असणार आहेत. तसंच, आयफोन 14 मध्ये असणाऱ्या म्युट स्विचची जागा एक नवं 'अ‍ॅक्शन बटण' घेणार आहे. यासोबतच, यामध्ये थंडरबोल्ट केपेबल यूएसबी-सी पोर्ट देण्यात येणार आहे. या आयफोनचा डिस्प्ले अधिक एफिशियंट असेल. तसंच यात 7nm U2 चिप देण्यात येईल.

आयफोन 15 अल्ट्रामध्ये 6GB/8GB रॅम मिळेल. यामध्ये 256GB स्टोरेजचा बेस व्हेरियंट असणार आहे. हा फोन 35W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. यामध्ये अधिक वेगवान मॅगसेफ/Qi 2 चार्जिंगचा पर्यायही देण्यात येईल. याची बॅटरी क्षमताही 10 ते 15 टक्क्यांनी वाढवण्यात येणार असल्याचं AppleLeaker च्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

iPhone 15 Features
iPhone 14 Saves Life : 400 फूट खोल दरीत कोसळली कार; 'आयफोन'च्या खास फीचरमुळे वाचला जीव

या फोनची अधिकृत किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ही किंमत iPhone 14 Pro Max पेक्षा सुमारे 200 डॉलर्स अधिक असू शकते, असा अंदाज वर्तवला आहे. या फोनचे फीचर्स आणि किंमत याबाबत अधिकृत माहिती 12 सप्टेंबरलाच स्पष्ट होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com