Google Sakal
विज्ञान-तंत्र

Google for India: जिथे तिथे AI चीच चर्चा! गुगल IIT मद्रासला रिसर्चसाठी देणार 'एवढे' कोटी

टेक कंपनी गुगलचा भारतातील Google For India 2022 इव्हेंट पार पडला आहे. या इव्हेंटमध्ये कंपनीद्वारे अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Google For India 2022 Event: दिग्गज टेक कंपनी गुगलचा भारतात मोठा इव्हेंट पार पडला आहे. Google For India 2022 इव्हेंटमध्ये कंपनीने अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. कंपनीने इव्हेंटमध्ये नवनवीन फीचर्स आणि प्रोजेक्टबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे गुगल आयआयटी मद्रासला तब्बल ८.२५ कोटी रुपये अनुदान म्हणून देणार आहे.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Google For India 2022 इव्हेंटमध्ये कंपनीने या अनुदानाची घोषणा केली आहे. यामुळे आयआयटी मद्रासचा समावेश आता स्टॅनफोर्ड आणि एमआयटी सारख्या संस्थांच्या यादीत झाला आहे. गुगल आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर (AI) रिसर्च करण्यासाठी संस्थेला १ मिलियन डॉलर म्हणजे ८.२५ कोटी रुपयांपेक्षा अधिक अनुदान देणार आहे. या अनुदानाद्वारे भारतातील पहिले मल्टी-डिसिप्लेनरी सेंटर स्थापन केले जाईल.

गुगल एआयवरील रिसर्चसाठी प्रोत्साहन देत आहे. नवीन रिसर्च सेंटरमुळे संशोधक, तज्ञ, डेव्हलपर्स, कम्यूनिटी मेंबर्सला एक व्यासपीठ निर्माण होईल.

आयआयटी मद्रासच्या रोबर्ट बॉश सेंटर फॉर डेटा सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे प्रमुख बी. रविंद्रन म्हणाले की, मल्टी-डिसिप्लेनरी हे या सेंटरचे वैशिष्ट्ये असेल. यामुळे एआयबाबत भारतातील संशोधनास मदत होईल. सध्या सरकार आणि उद्योगांसह इतर क्षेत्रांमध्ये आधीपासूनच एआयचा वापर केला जात आहे. भविष्यात याच्याआधी अधिक लोक जोडली जाते. यामुळे नवनवीन संशोधन करता येईल.

रवींद्रन म्हणाले की, या सेंटरसाठी गुगल पुढे आले आहे. गुगलप्रमाणेच इतर अनेक मोठ्या कंपन्यांनी मद्रास आयआयटीच्या या सेंटरमध्ये रस दाखवला आहे. एवढेच नाही तर नीति आयोगाने देखील यात रस दाखवला आहे. सरकारी कामे व उद्योग जगतात एआयचा वापर वाढला आहे. एआयबाबत अनेक वाद देखील समोर येत आहे. पश्चिमेकडील देशांमध्ये कायदे लागू करण्यासाठी याचा वापर केला जात आहे. मात्र, पुरेसा डेटा नसल्याने निष्पक्षतेबाबत देखील प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा: PM Modi: ट्विटरने हटवली पंतप्रधान मोदींची ब्लू टिक, केला 'हा' मोठा बदल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT