यंदाच्या वर्षात 'या' गाड्यांना मिळाला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद, फीचर्समध्ये अव्वल | Year Ender 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Car

Year Ender 2022: यंदाच्या वर्षात 'या' गाड्यांना मिळाला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद, फीचर्समध्ये अव्वल

New Car Launched in India 2022: भारतीय बाजारात वर्ष २०२२ मध्ये अनेक शानदार वाहन लाँच झाले आहेत. गेल्या दोन वर्षात करोना व्हायरस आणि सेमीकंडक्टर चिपच्या तुटवड्यामुळे ऑटोमोबाइल सेक्टरला मोठा फटका बसला होता. मात्र, २०२२ वर्ष सेक्टरसाठी चांगले ठरले आहे. यावर्षात लाँच झालेल्या टॉप-५ शानकार गाड्यांविषयी जाणून घेऊया.

Tata Tiago EV

Tata Tiago EV

Tata Tiago EV

Tata Motors ने Nexon EV ला लाँच करत इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये क्रांती आणली आहे. ही भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. ८.४९ लाख रुपये सुरुवाती किंमतीत येणाऱ्या या कारमध्ये १९.२kWh आणि २४kWh बॅटरी पॅक मिळेल. ही कार सिंगल चार्जमध्ये सहज ३०० किमी अंतर पार करू शकते.

Maruti Suzuki Grand Vitara

Maruti Suzuki ने यावर्षी Grand Vitara या मिड-साइज एसयूव्हीला सादर केले आहे. सेल्फ चार्जिंग हायब्रिड वाहन खरेदी करण्याचा विचार असल्यास Grand Vitara स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंट पर्याय निवडू शकता. तर इतर लोक ग्रँड व्हिटारा AWD व्हेरिएंट निवडू शकतात. या सेगमेंटमध्ये कोणतीच कंपनी हे दोन फीचर्स देत नाही.

Mahindra Scorpio-N

Mahindra Scorpio-N

Mahindra Scorpio-N

२०२२ मध्ये लाँच झालेल्या Mahindra Scorpio-N ल ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. महिंद्राने दमदार गाड्या सादर करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. खराब रस्त्यांवर देखील तुम्ही सहज या गाडीला चालवू शकता. महिंद्रा लवकरच गाडीचे नवीन व्हर्जन देखील लाँच करणार आहे. महिंद्राच्या या गाडीत पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. या एसयूव्हीची किंमत जवळपास १२ लाख रुपयांपर्यंत आहे.

Mahindra XUV300 TurboSport

वर्ष २०२२ मध्ये Mahindra ने XUV300 TurboSport ला देखील सादर केले आहे. या एसयूव्हीमध्ये पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. Mahindra XUV300 TurboSpor मध्ये १.२ लीटर इंजिन देण्यात आले असून, हे १२९bhp पॉवर जनरेट करते. या कारची किंमत १० लाख रुपयांपर्यंत आहे.

Kia EV6

Kia ने भारतीय बाजारात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. २०२२ मध्ये ग्राहकांची पसंती मिळालेल्या टॉप कारमध्ये Kia EV6 चा समावेश आहे. किआच्या या पहिल्या ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये ७७.४ kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कार अवघ्या ५.२ सेकंदात ० ते १०० किमी अंतर वेग पकडू शकते. तर फुल चार्जमध्ये तब्बल ७०८ किमी अंतर पार करू शकते.

हेही वाचा: Elon Musk: जनमताचा कौल! मस्क ट्विटर सोडणार? पाहा काय आला पोलचा रिझल्ट