Google Smartphone esakal
विज्ञान-तंत्र

Google Smartphone: iPhone च्या स्पर्धेत आता गूगल उतरणार? लवकरच गूगल आणणार हा स्मार्टफोन, फिचर्सही तुफान

चला तर या फोनबद्दल सविस्तर जाणून घेऊया

साक्षी राऊत

Google New Smartphone Features : अ‍ॅप्पलचा आयफोन शूटिंगसाठी सर्वोत्तम मानला जातो. आयफोन 14 वरून अनेक चित्रपट शूट केले गेले आहेत. आता गुगल स्वतःचा जबरदस्त स्मार्टफोन घेऊन येत आहे, ज्यामुळे अॅप्पल कंपनीला आता बरोबरीची टक्कर मिळणार आहे.

Google त्याच्या आगामी Pixel 8 स्मार्टफोनसाठी नवीन 'व्हिडिओ अनब्लर' टूलवर काम करत आहे. व्हिडिओ अनब्लर टूल यूजर्सचे व्हिडिओ क्रिस्प आणि क्लियर करेल. चला तर या फोनबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Google Pixel 8 Unblur Tool

मशीन लर्निंगच्या मदतीने, या टूलने पूर्वी कॅप्चर केलेल्या व्हिडिओंना अधिक स्पष्ट स्वरूप देणे अपेक्षित आहे. Google Photos मधील फोटो अनब्लर टूल, जे फोटो ब्राइट करण्यासाठी Tensor चिपच्या मशीन लर्निंग क्षमतेचा लाभ घेते, जे Pixel 7 सीरीज लाँच करताना सादर करण्यात आले.

याआधी अशी अफवा पसरली होती की लेटेस्ट पिक्सेल 8 स्नार्टफोन लाइनअप एका डेव्हलप कॅमेरा सेंसर, आईसोसेल जीएन2 सोबत येईल. ज्यामध्ये फोटो आणि व्हिडिओंमध्ये चांगल्या डायनॅमिक रेंजसाठी स्टेबल हाय डायनॅमिक रेंज (HDR) कार्यक्षमता आहे. Pixel 8 आणि Pixel 8 Pro 12 GB RAM पॅक असण्याची अपेक्षा आहे.

शिवाय, प्रो मॉडेल 2822/1344 पिक्सेलचे डिस्प्ले रिझोल्यूशन ऑफर करण्याची शक्यता आहे, तर Pixel 8 स्टँडर्ड 2268/1080 रिझोल्यूशन ऑफर करेल अशी अपेक्षा आहे.

गुगलचा याआधीही एक फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेच. त्याचे फिचर्ससुद्धा चांगले आहेत. या नव्या फोनची चर्चा मात्र सगळीकडे जोरदार चालली असल्याचे दिसून येते. कारण हा स्मार्टफोन आयफोनशी स्पर्धा करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT