IPhone : iPhone चे डिलीट केलेले मेसेज तुम्ही सहज वाचू शकता,ही आहे टेक्निक

जर तुम्ही आयफोन युजर असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची
IPhone
IPhoneesakal

IPhone : जर तुम्ही आयफोन युजर असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अनेक वेळा असे घडते की तुमच्या फोनमधील महत्त्वाचे मेसेज चुकून डिलीट होतात. अशा स्थितीत तुम्ही मेसेज रिकव्हर करण्याचा खूप प्रयत्न करता पण तुमचे सर्व प्रयत्न अपयशी ठरतात. आज आम्ही तुम्हाला या समस्येवर उपाय सांगणार आहोत, तुम्ही डिलिट केलेले महत्त्वाचे मेसेज किंवा चॅट्स कसे रिकव्हर करू शकता. यासाठी iOS 16 मध्ये चुकून डिलीट झालेल्या चॅट्स रिकव्हर करण्यासाठी एक फीचर आहे, ज्याबद्दल बहुतेक युजर्सना माहिती नाही, पण या फीचरच्या मदतीने तुम्हाला जुने डिलीट केलेले मेसेज परत मिळतील.

IPhone
Mental Health : तुमच्या जवळच्यांपैकी कोणाचा स्वभाव स्वतःचं खरं करण्याचा आहे का? सावधान...

या गोष्टींची विशेष काळजी घ्या

चॅट परत मिळवण्यासाठी या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. यासाठी, सर्वप्रथम तुमचे डिव्हाइस iOS 16 वर अपडेट झाले आहे का ते चेक करा. अॅपलच्या एका रिपोर्टनुसार, यूजर्सचे डिलीट केलेले मेसेज iOS 16, iPadOS 16.1 किंवा त्यानंतरच्या सर्व वर्जन मध्ये रिकव्हर केले जाऊ शकतात. पण तुम्ही फक्त गेल्या 30 ते 40 दिवसांत डिलीट केलेले मेसेज किंवा चॅट्स रिकव्हर करू शकता. यापेक्षा जुने मॅसेज परत मिळवता येणार नाहीत. जर तुम्ही iOS 16 वर अपडेट करण्यापूर्वी एखादा मेसेज डिलीट केला असेल, तर तुम्ही तो मेसेज रिकव्हर करू शकत नाही.

IPhone
Technology News : गुगल आणि मेटाचे हजारो कर्मचारी काम न करता पगार घेत होते

चॅट परत मिळवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

१. सर्व प्रथम, 'Conversation' पेजवर जा आणि 'edit'

ऑप्शनवर क्लिक करा.

२. Conversation पेजवरील 'filter' ऑप्शनवर क्लिक करा.

३. यानंतर, 'शो रिसेंटली डिलीटेड' या ऑप्शनवर क्लिक करा.

IPhone
Technology News : गुगल आणि मेटाचे हजारो कर्मचारी काम न करता पगार घेत होते

४. आता इथे तुम्हाला हवे असलेले चॅट निवडा जे तुम्हाला

५. आता 'Recover Message' या ऑप्शनवर क्लिक करा.

६. या स्टेप फॉलो केल्यानंतर, तुम्ही तुमचे जुने मेसेज किंवा चॅट्स परत मिळवू शकता. यासाठी, फक्त तुमचा iPhone iOS 16 वर अपडेट केला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com