hyundia all new i20 
विज्ञान-तंत्र

ह्युंडाइची All New i20 लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली -  भारतातील कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी आघाडीची कंपनी असलेली ह्युंडाई मोटार इंडिया लिमिटेडने आता ऑल न्यू 2020 i20 कार लाँच केली आहे. नव्या Hyundai i20 मध्ये ग्राहकांना तीन इंजिनचे पर्याय दिले असून त्यासोबत 13 कलर व्हेरिअंटचा पर्यायसुद्धा आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने कार लाँच केली आहे. 

नवी Hyundai i20 अनेक रंगात उपलब्ध आहे. यामध्ये पोलर व्हाइट, टायफून सिल्वर, टायटन ग्रे, फेरी रेड, स्टेरी नाइट आणि मेटॅलिक कॉपर या रंगांचा समावेश आहे. याशिवाय पोलर व्हाइट आणि फेरी रेडमध्ये ब्लॅक रूफचा ऑप्शनही आहे. कंपनीने ही कार तीन इंजिनमध्ये लाँच केली आहे. यात 1.2-लीटर Kappa पेट्रोल, 1.5 लीटर डीझेल आणि 1.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन युनिटसह इंटेलिजंट मॅन्युअल ट्रान्समिशनसुद्धा देण्यात आलं आहे.

पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध असलेल्या कारमध्ये 1.2 लीटर नॅचरली एस्पायर्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. याची क्षमता 83hp इतकी असून 115Nm टॉर्क जनरेट होतो. इतर पेट्रोल ऑप्शनमध्ये1.0 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन असून याची क्षमता 120hp इतकी आहे. तसंच 172Nm टॉर्क जनरेट होतो. 1.2 लीटर पेट्रोलमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. 1.0-लीटर टर्बो पेट्रोल कारमध्ये 7-स्पीड DCT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. 

ह्युंडाइने ऑल न्यू Hyundai i20 कार 6.80 लाख रुपयांपासून 10.60 लाख रुपयांपर्यंत ठेवली आहे. यामध्ये पेट्रोल व्हेरिअंटची कमीत कमी किंमत 6.80 लाख रुपये असून डिझेल व्हेरिअंटची किमान किंमत 8.20 लाख रुपये इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाकण-नागोठणे दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा

IND A vs SL A, Test: सुदर्शनचं शतक, तर गुरनूर ब्रारच्या १० विकेट्स, भारताचा श्रीलंकेवर चौथ्याच दिवशी दणदणीत विजय

Marathi Live Updates : मुंबई गोवा महामार्गावर वाकण ते नागोठणे दरम्यान भीषण वाहतूक कोंडी

Amba River Flood: मुसळधार पावसाचा कहर! अंबा नदीला महापूर; वाकण-पाली मार्गावर अडकलेल्या २८ जणांची थरारक सुटका..

नाग चावायला आला; मद्यधुंद व्यक्तीनं त्यालाच कच्चं खाल्लं, नंतर दुसरा सापही गिळला, तिसऱ्याला खायला गेला तेवढ्यात...

SCROLL FOR NEXT