Google Pay नव्या रुपात; आयकॉनमध्ये बदल

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 5 November 2020

प्रसिध्द पेमेंट्स ऍप Google Pay त्यांच्या ऍप आयकॉनमध्ये बदल करत आहे

नवी दिल्ली: प्रसिध्द पेमेंट्स ऍप Google Pay त्यांच्या ऍप आयकॉनमध्ये बदल करत आहे. नवीन आयकॉन जुन्यापेक्षा पुर्णपणे वेगळा असून ते कंपनीच्या थीम कलरसारखंच आहे.

पहिल्यांदा भारतात Google Payला Tez या नावाने लॉंच केलं होतं. यानंतर काही दिवसांपुर्वी याचं नाव बदललं होतं. सध्या गुगल पे भारतात मोठ्या प्रमाणात प्रसिध्द होत आहे.

सध्याच्या गुगल पेच्या आयकॉनमध्ये  Google चं 'G' आणि त्यापुढे Pay असं लिहिलं आहे. आता येणाऱ्या गुगल पेच्या नवीन आयकॉनमध्ये G पण नाही आणि  Pay हा शब्दही नसेल.

भारतीय सेनेने लाँच केले SAI मॅसेंजिग ऍप; असणार WhatsApp सारखे फिचर्स

गुगल पेच्या नवीन ऍप आयकॉनमध्ये अनेक रंगांचे मिश्रण आहे. यामध्ये निळा, हिरवा, पिवळा आणि लाल रंगाचा उपयोग केला आहे. गूगलच्या ब्रॅंडींगमध्येही या कलरचा उपयोग केला जातो.  

या नवीन आयकॉनमध्ये इंग्रजीमधील u आणि n चा शेप आहे. नवीन आयकॉनमध्ये दोन्ही लेटरचे ओव्हरलॅपींग केल्याचे दिसत आहे. हा लोगो दिसायला 3D दिसत आहे.

9to5google च्या मतानुसार, गुगल पे मधील हे बदल भारतातील बऱ्याच युजर्संना अपडेट केल्यानंतर दिसले आहेत. सध्याच्या गुगुल पे ऍपच्या आयकॉनवर Google Pay लिहलेलं आहे. पण नवीन आयकॉनच्या जवळ  GPay असं लिहलेलं आहे.

भारतात आजपासून PUBG पुर्णपणे बंद; कंपनीने फेसबूकवरून दिली माहिती

ट्विटरवरदेखील काही लोकांनी गुगलच्या नवीन लोगो टाकला आहे. नवीन लोगो गुगुल पेच्या 116.1.9 (Beta) या वर्जनसोबत आणला आहे.

लवकरच  Google Pay चा नवीन लोगो सर्वांसाठी दिसणार आहे. पण कंपनीने अधिकृतपणे याची कोणतीही माहिती दिली नाही.़

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: google pay is coming with new icon have colour mixture