ISRO Aditya L1 Update eSakal
विज्ञान-तंत्र

ISRO Aditya L1 : इस्रोच्या 'आदित्य' वरील 'पापा' पेलोड सुरू, यानाकडून माहिती मिळाली; चुंबकीय क्षेत्राचे मोजमाप तपासले

Aditya L1 PAPA : कमी ऊर्जा श्रेणीतील सौर पवन इलेक्ट्रॉन आणि आयन यांच्या मोजमापासाठी तयार केलेले ‘PAPA’ हे उपकरण ऊर्जा आणि वस्तुमान विश्लेषक आहे.

सकाळ वृत्तसेवा

Aditya L1 PAPA Payload Activated : भारताची पहिली सौरमोहीम ‘आदित्य - एलवन’कडून मिळालेली नवी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी जाहीर केली आहे. ‘आदित्य- एलवन’वरील ‘प्लाझ्मा ॲनलायझर पॅकेज फॉर आदित्य’ (पापा) या उपकरणाने सूर्यप्रभेच्या परिणामांचा अभ्यास केला आहे.

कमी ऊर्जा श्रेणीतील सौर पवन इलेक्ट्रॉन आणि आयन यांच्या मोजमापासाठी तयार केलेले ‘PAPA’ हे उपकरण ऊर्जा आणि वस्तुमान विश्लेषक आहे. त्यात ‘सोलर विंड इलेक्ट्रॉन एनर्जी प्रोब’ (स्वीप) हा एक सेंसर असून दहा इलेक्ट्रॉन व्होल्ट ते तीन किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा श्रेणीतील इलेक्ट्रॉनची मोजणी त्याद्वारे होते.

दुसरा सेंसर ‘सोलर विंड आयन कॉम्पोझिशन ॲनलायझर हा दहा इलेक्ट्रॉन व्होल्ट ते २५ किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि एक ते ६० अणू वस्तुमान एकक द्रव्यमान श्रेणीतील आयन मोजतो. सौर वाऱ्याच्या कणांच्या आगमनाची दिशा मोजण्यासाठीचे सेन्सर देखील सज्ज आहेत.

'पापा’ उपकरणाने १५ डिसेंबर २०२३ आणि १० व ११ फेब्रुवारी २०२४ दरम्यानच्या सूर्यप्रभेचा अभ्यास केला आहे. १५ डिसेंबर रोजी सूर्यप्रभेतील परिणाम एकदाच दिसला. यादरम्यान इलेक्ट्रॉन आणि आयनच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचे आढळले.

‘डीप स्पेस क्लायमेट ऑब्झर्व्हेटरी आणि ॲडव्हान्स्ड कंपोझिशन एक्सप्लोरर’ या उपग्रहांकडून मिळालेल्या सौर पवन मापदंड आणि चुंबकीय क्षेत्र मोजमापातही समानता आढळली आहे. याउलट १० व ११ फेब्रुवारीत झालेल्या सूर्यप्रभेतील छोटे-छोटे परिणाम दिसून आले आणि त्याचवेळी इलेक्ट्रॉन आणि आयनच्या वेळेतील फरकही नोंदविण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT