wagonr 7 seater 
विज्ञान-तंत्र

मारुती सुझुकी 7 सीटर WagonR लाँच करण्याच्या तयारीत?

सूरज यादव

नवी दिल्ली - मारुती सुझुकी त्यांच्या लोकप्रिय WagonR चे 7 सीटर मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे. नुकतंच चाचणीवेळी अशी एक कार दिसल्यानं 7 सीटर WagonR ची चर्चा होत आहे. मारुती सुझुकी कंपनीने अशा कारची संकल्पना 2013 मध्ये इंडोनेशियात झालेल्या एका मोटर शोमध्ये मांडली होती. यानंतर गाडीच्या या युनिक मॉडेलबाबत कोणतीच चर्चा झाली नव्हती. दरम्यान, आता गुरुग्राम- दिल्ली एक्सप्रेस वेवर एक टेस्टिंग मॉडेल पाहण्यात आलं आहे. ज्यावरून असा अंदाज बांधला जात आहे की, मारुती सुझुकी कंपनी 7 सीटर वॅगन आर गाडी लाँच करण्याची तयारी करत आहे. 

मारुती वॅगनआरच्या तुलनेत टेस्टिंग करताना पाहण्यात आलेल्या मॉडेलची लांबी थोडी जास्त दिसत आहे. यामुळे गाडीमध्ये आणखी एक सीट मागे वाढवण्यासाठी पुरेशी स्पेस मिळेल असं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार असंही सांगण्यात येतं की, 7 सीटर वॅगनआरची लांबी स्टँडर्ड मॉडेलपेक्षा थोडी जास्त असेल मात्र ती 4 मीटरपेक्षा कमीच असेल. 

स्टँडर्ड मारुती वॅगन आरच्या तुलनेत या नव्या वॅगनआरचं स्टायलिंग वेगळं असेल. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइनचं ग्रिल, फ्रंट आणि रिअर बंपर आणि वेगळे हेडलॅम्प आणि टेललॅम्प मिळण्याची शक्यता आहे. प्लॅटफॉर्म, इंजिन ऑप्शन आणि बॉडी पॅनल्स हे सध्याच्या वॅगनआर सारखेच असतील. 

डॅशबोर्ड आणि फ्रंटसीटसह 7 सीटर कारचे इंटेरिअरसुद्धा स्टँडर्ड वॅगनआर प्रमाणेच असेल. टेस्टिंग मॉडेलमध्ये अलॉय व्हील आहेत. यामुळे 7 सीटर वॅगनआरमध्ये अलॉय व्हीलचा पर्याय असण्याची शक्यता आहे. 

रिपोर्टनुसार 7 सीटर वॅगनआर सर्वात पहिल्यांदा इंडोनेशियात लाँच केली जाण्याची शक्यता जास्त आहे. भारतीय बाजारातसुद्धा ही कार लवकरच येऊ शकते. मारुतीच्या लाइनअपमध्ये एमपीव्ही आर्टिगानंतर याच गाडीचा नंबर असू शकतो. तसंच ही कार बाजारात आल्यास रेनॉच्या ट्रायबर सारख्या लहान एमपीव्ही गाड्यांना टक्कर देईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eBay Layoff: आधी 800 जणांची नोकरी गेली, आता आणखी 1,000 जणांवर संकट! eBay चा मोठा निर्णय; कोणाची नोकरी जाणार?

Eknath Shinde: ५०० कोटी घेतल्याचे आरोप करण्यापूर्वी खातरजमा करायला हवी, मनोज जरांगेंच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

Latest Marathi News Live Update : सत्य लोकांसमोर ठेवले, आता डोळे उघडतील, मनोज जरांगेंचा दावा

अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल; चार दिवसांपासून कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू, नेमकं कारण काय?

Vastu Tips: घरात पोपट येणे 'हे' शुभ मानले जाते की अशुभ? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरात पोपट आल्याने काय होते?

SCROLL FOR NEXT