आली स्वस्तातली इलेक्ट्रिक स्कूटर, धावते 110 किलोमीटर

electric scooter
electric scooter

नवी दिल्ली - RR Global च्या मालकीची BGauss या कंपनीने दोन इलेक्ट्रिकल स्कूटर्स लाँच केल्या आहेत. या स्कूटरची फीचर्स आणि इतर माहिती कंपनीने दिली आहे. BGauss A2 आणि BGauss B8  अशा दोन स्कूटर्स अनेक व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहेत. यात BGauss A2 ही स्वस्तातली असून BGauss B8 महागडी आहे. 

BGauss A2 ही स्लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ही स्कूटर दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. यात लेड अॅसिड आणि लिथियम आयन यांचा समावेश आहे.  250 वॅटचं मोटर देण्यात आलं असून स्कूटरच्या लेड अॅसिड व्हेरिअंटमध्ये 22.3 एएच लेड अॅसिड बॅटरी आणि लिथियम आयन व्हेरिअंटमध्ये 1.29 KW लिथियम  आयन बॅटरी देण्यात आली आहे. 

A2 इलेक्ट्रिक स्कूटरच्या लेड अॅसिड व्हेरिअंटची बॅटरी 5 ते 6 तासात 80 टक्के चार्जिंग होते तर 7 ते 8 तासात पूर्ण चार्ज होईल. लिथियम व्हेरिअंटची बॅटरी त्या तुलनेत लवकर चार्ज होते. पूर्ण बॅटरी चार्जिंग व्हायला 2 तास 15 मिनिटे लागतात.  कंपनीने दावा केला आहे की, A2 इलेक्ट्रिक स्कूटरच्या दोन्ही व्हेरिअंट एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर जवळपास 110 किलोमीटर पर्यंत धावतील. या स्कूटरचं टॉप स्पीड 25 किमी प्रतितास इतकं आहे. 

BGauss च्या या स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरच्या दोन्ही व्हेरिअंटमध्ये 10 इंच अलॉय व्हील आहे. दोन्ही व्हेरिअंटमध्ये 180 एमएम डिस्क ब्रेक असून दोन्ही व्हेरिअंटमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिमही आहे. 

स्कूटरमध्ये साइड स्टँड सेन्सर, रिव्हर्स अॅसिस्ट, युएसबी चार्जिंग, अँटी थेफ्ट अलार्म, रिमोट लॉक-अनलॉक आणि फाइंड युवर व्हेइकल यासारखी फीचर्स देण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर मोबाइल अॅप सपोर्टसह मिळते. 

BGauss A2 च्या लेड अॅसिड व्हेरिअंटची किंमत 52 हजार 499 रुपये इतकी तर लिथियम आयन व्हेरिअंटची किंमत 67 हजार 999 रुपये आहे. कंपनीच्या वेबसाईटवर ही इलेक्ट्रिक स्कूटर 3 हजार रुपयात बूक करता येते. सध्या या स्कूटरचं बूकिंग बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि पनवेल इथं सुरू झालं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com