instagram esakal
विज्ञान-तंत्र

Instagramवर खूप वेळ घालवता का! मग हे वाचा

शुक्रवारी इंस्टाग्रामने 'टेक अ ब्रेक' फिचरची घोषणा केली

सकाळ डिजिटल टीम

आजकाल इंस्टाग्रामवर अनेकजण खूप वेळ घालवतात. फोटो, व्हिडिओ, रिल्स पाहण्यात त्यांचा वेळ कसा जातो हे कळत नाही. काहीवेळा हे बघताना महत्वाची कामंही बाजूला पडतात. त्यामुळे तुम्ही अ‍ॅपवर (App) खूप वेळ घालवत आहात याची जाणीव चक्क इंस्टाग्रामच (Instagram) तुम्हाला करून देणार आहे. यासाठी कंपनीने Take a Break फिचर भारतात (India) लॉंच केले आहे. याद्वारे इंस्टाग्रामवर खूप वेळ घालवत असाल तर मध्ये मध्ये इंस्टाग्रामच तुम्हाला ब्रेक घेण्याची आठवण करेल. त्यामुळे हे फिचर कसे काम करेल ते जाणून घेणे गरजेचे आहे. येत्या काही दिवसात हे फिचर युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.

असे असेल फिचर

शुक्रवारी इंस्टाग्रामने 'टेक अ ब्रेक' फिचरची घोषणा केली. त्यानुसार Instagram वापरणारे ठराविक वेळ घालवल्यानंतर काही काळ या प्लॅटफॉर्मवरून ब्रेक घेऊ शकतात. नवीन फीचरमध्ये तीन टाईम स्लॉट देण्यात आले आहेत. यात 10 मिनिटे, 20 मिनिटे आणि 30 मिनिटांचा रिमाईंडर लावता येणार आहे. तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन यापैकी कोणताही टाइम स्लॉट निवडू शकता. इतका वेळ इंस्टाग्राम वापरल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर ब्रेक घ्या अशी सूचना येईल. यानंतर तुम्ही हो वर क्लीक करून ब्रेक घेऊ शकता.

Instagram

अशी वेळ का आली?

आजकाल तरुणाई इंस्टाग्रामवर बराच वेळ घालवत आहे. त्यामुळे कंपनीवर सातत्याने टीका होत आहे. अमेरिकेतही कंपनीला विरोध सहन करावा लागत आहेत. हे सर्व पाहता हे नवीन फीचर कंपनीने आणले असून ते महत्वाचे ठरणार आहे. इंस्टाग्रामच्या पब्लिक पॉलिसी मॅनेजर नताशा जोग यांनी सांगितले की, 'तरुणांचे आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या फिचरमुळे त्यांना इंस्टाग्रामचे जे व्यसन लागले आहेत त्यापासून थोडंतरी लांब ठेवू शकू. तरुण आणि पालकांना या प्लॅटफॉर्मवर अधिक चांगला अनुभव देण्यासाठी आम्ही 'टेक अ ब्रेक' लाँच केले आहे, असेही नताशा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT