boAt चे स्वस्तात मस्त हेडफोन! 10 मिनीटं चार्जमध्ये 10 तास प्लेटाईम

 boAt Nirvana 751
boAt Nirvana 751

बोट (boAt) ने भारतात boAt Nirvana 751 हेडफोन लाँच करून त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक परवडणारे हेडफोन जोडले आहे. विशेष बाब म्हणजे BoAt Nirvana हा कंपनीचा पहिला वायरलेस हेडफोन आहे जो Active Noise Cancellation (ANC) सह येतो. हेडफोन्समध्ये नॉईस कँसलेशन सुरु करण्यासाठी एक बटण आहे. याशिवाय, हेडफोन 65 तासांपर्यंत प्लेबॅक, फास्ट चार्जिंगसह अनेक दमदार फीचर्ससह येतो.

कमी बजेटमध्ये चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट्स बाजारात घेऊन येण्यासाठी कंपनी लोकप्रिय आहे. यातच कंपनीने निर्वाण 751 देखील बजेट सेगमेंटमध्ये लॉन्च केले आहेत. एक्टिव्ह नॉईस कँसलेशनसह येणारा हा बॉटचा पहिला बजेट हेडफोन आहे. चला तर मग हेडफोन्सच्या किंमती आणि फीचर्सवर एक नजर टाकूया.

किंमत किती?

BoAt Nirvana 751 हा हेडफोन्स ची किंमत 3,999 रुपये आहे. हेडफोन्स अॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवरून खरेदी करता येतील. तसेच BoAt Nirvana 751 ब्लॅक, ब्लू, सिल्व्हर या कलर्समध्ये सादर करण्यात आली आहे. हेडफोन्सची पहिली विक्री 8 फेब्रुवारीला होणार आहे.

 boAt Nirvana 751
NFT म्हणजे काय? त्याबद्दल इतकी चर्चा का होतेय? जाणून घ्या सोप्या भाषेत

BoAt Nirvana 751 चे फीचर्स काय आहेत

इमर्सिव्ह साऊंड क्वालिटीसाठी हेडफोन 40mm ड्रायव्हर्सने सुसज्ज आहे. हा कंपनीचा पहिला बजेट हेडफोन आहे जो Active Noise Cancellation सह येतो. 5000 रुपयांच्या खालीActive Noise Cancellation हेडफोन मिळणे कठीण आहे.

डिव्हाइसमध्ये ANC चालू आणि बंद करण्यासाठी एक बटण देखील आहे. कंपनीचा दावा आहे की, हेडफोन एका चार्जवर 65 तासांचा प्लेटाइम देऊ शकतात. ANC चालू असताना, ते 50 तासांपेक्षा जास्त काळ टिकू शकते.

हेडफोन फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतात याचा अर्थ तुम्ही फक्त 10 मिनिटांसाठी डिव्हाइस चार्ज करून दहा तासांचा प्लेटाईम मिळवू शकता. ANC व्यतिरिक्त, हेडफोन्स अॅम्बियंट मोडसह देखील येतात ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या आसपासच्या आवाजाची जाणीव होऊ शकते.

 boAt Nirvana 751
'या' इलेक्ट्रिक स्कूटर्सची होतेय जोरदार विक्री, नोंदवली 366% वाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com