Mukesh Ambani New Car 
विज्ञान-तंत्र

Mukesh Ambani New Car: बॉम्ब असूद्या की आग, काहीच फरक पडणार नाही! अंबानींनी घेतली नवी मर्सिडिज

Sandip Kapde

Mercedes s680 Guard: आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे एकापेक्षा जास्त आलिशान गाड्या आहेत. आता त्यांनी नवीन गाडी घेतल्याची चर्चा आहे. मुकेश अंबानी यांच्या ताफ्यात आता मर्सिडीज S680 गार्ड ही बॉम्ब-प्रूफ कार समाविष्ट झाली आहे. मर्सिडीज-बेंझ S680 गार्ड लक्झरी कार बाहेरून इतर मर्सिडीज-बेंझ एस-क्लाससारखीच दिसते, परंतु ती रेग्युलर सेदानपेक्षा जवळपास 2 टन जड आहे.

मुकेश अंबानींच्या या लक्झरी बुलेटप्रूफ कारची किंमत 10 कोटी रुपये आहे. मुकेश अंबानींची नवीन मर्सिडीज S680 गार्ड नेहमीच्या मॉडेलसारखी दिसते. सिल्व्हर कलरमुळेच ही कार खूप रित दिसते. यामध्ये VR10 स्तरावरील सुरक्षा प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. (latest marathi news)

मुकेश अंबानींच्या मर्सिडीज S680 गार्ड लक्झरी कारवर बॉम्ब आणि बुलेटचा परिणाम होत नाही. ही कार स्वयंचलित शस्त्रांपासून बनवलेल्या आगीचाही सहज सामना करू शकते. इतकंच नाही तर 2 मीटर अंतरावरून 15 किलो वजनाचा टीएनटी स्फोटही या गाडीवर परिणाम करत नाही.

मुकेश अंबानी यांची मर्सिडीज S680 गार्ड बुलेटप्रूफ कार अनेक उत्तमोत्तम वैशिष्ट्यांनी सज्ज आहे. त्यात पॉली कार्बोनेट लेपित खिडक्या आहेत. याशिवाय कारची बॉडी एका खास प्रकारच्या मजबूत स्टीलपासून बनवण्यात आली आहे. या कारमध्ये कंपनीने 6.0 लीटर क्षमतेचे V12 बाय टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन बसवले आहे.

हे इंजिन कारमध्ये 612 bHP पॉवर आणि 850 Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय कारमध्ये 7-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या कारची आणखी एक खासियत म्हणजे कारच्या वजनानुसार तिचे सस्पेन्शन सेट करता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Rule: फ्रँचायझींकडून हरकती अन् आयपीएलच्या फॉरमॅटमध्ये बदल; वादग्रस्त नियम हटवणार? BCCI च्या Emailमध्ये नेमकं काय?

Mohan Bhagwat Canada Visit : भारत 'महाशक्ती' की ‘विश्वगुरू’ ? कॅनडातील भाषणात मोहन भागवतांनी सांगितला भारतीय विचार

Kolhapur Wildlife News : गगनबावड्यात आढळला साडेपाच फूट लांबीचा अजगर; ग्रामस्थांची उडाली भंबेरी, वन विभागाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा धोका

Pune Crime: कौटुंबिक वादातून मुलाकडून आईला बेदम मारहाण; उपचारांपूर्वीच मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना यवत पोलिसांची नोटीस; आक्रोश मोर्चाबाबत महत्त्वाच्या सूचना

SCROLL FOR NEXT