KIA Seltos Old Vs New : नव्या सेल्टॉस फेसलिफ्टचा लुक जुन्याहून कसा वेगळा? पाहा फोटो

सेल्टॉस फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये तब्बल 18 व्हेरियंट देण्यात आले आहेत.
KIA Seltos Old Vs New
KIA Seltos Old Vs NeweSakal
Updated on

KIA Seltos Comparison : कियाने आपल्या सेल्टॉस या एसयूव्ही कारचं नवीन व्हर्जन लाँच केलं आहे. सेल्टॉस फेसलिफ्ट असं हे व्हर्जन आहे. यामध्ये तब्बल 18 व्हेरियंट देण्यात आले आहेत. नवीन फीचर्स आणि टर्बो-पेट्रोल इंजिनसह हे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करण्यात आलं आहे.

कियाच्या या नवीन गाडीचं बुकिंग सुरू झालं आहे. याची प्राईज रेंज ही 10.89 लाख रुपये, ते 19.99 लाख रुपये एवढी असण्याची शक्यता आहे. यामध्ये केवळ फीचर्सच नाही, तर कारच्या लुकमध्येही मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. नवीन फेसलिफ्ट व्हर्जन हे जुन्या सेल्टॉसपेक्षा किती वेगळं दिसतंय, हे आपण पाहणार आहोत. कारदेखो वेबसाईटने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. (KIA Seltos Facelift)

KIA Seltos Old Vs New
KIA Seltos Facelift Booking : कियाने आणलं सेल्टॉसचं फेसलिफ्ट व्हर्जन; अशा प्रकारे करा ऑनलाईन बुकिंग

पॉवरट्रेन

जुन्या सेल्टॉसमधील 1.5 लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन नवीन फेसलिफ्टमध्ये कायम ठेवण्यात आलं आहे. मात्र, फेसलिफ्टमध्ये 1.5 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनचा एक पर्याय देखील देण्यात आला आहे. नवीन सेल्टॉस फेसलिफ्टमध्ये पाच प्रकारचे ट्रान्समिशन ऑप्शन देण्यात आले आहेत.

KIA Seltos Old Vs New
KIA Seltos Old Vs NeweSakal

फ्रंट लुक

पुढच्या बाजूने सेल्टॉसमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. सेल्टॉसच्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये टायगर ग्रिल देण्यात आली आहे. जुन्या सेल्टॉसच्या तुलनेत याची साईज मोठी आहे, तसंच यात हनीकोंब पॅटर्न देण्यात आला आहे. हेडलाईट्सना देखील आणखी स्टायलिश लुक देण्यात आला आहे. (Car news)

KIA Seltos Old Vs New
KIA Seltos Old Vs NeweSakal

फ्रंट बंपरला आणखी तगडा लुक देण्यात आला आहे. जुन्या सेल्टॉसमध्ये असलेल्या फॉग लॅम्पमध्ये तीन एलईडी क्यूब देण्यात आले होते. तर, फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये चार एलईडी क्यूब देण्यात आले आहेत. पुढच्या बाजूने कार अधिक दमदार दिसावी यासाटी स्किड प्लेटही देण्यात आली आहे.

साईड प्रोफाईल

सेल्टॉसच्या साईड प्रोफाईलमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. नवीन फेसलिफ्ट मॉडेल हे बाजूने जुन्या मॉडेलप्रमाणेच दिसतं. यात करण्यात आलेला एकमेव बदल म्हणजे, 18-इंच अलॉय व्हील्स जे पूर्वी X-लाईनमध्ये उपलब्ध होते; ते आता GT-लाईनमध्ये देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

KIA Seltos Old Vs New
KIA Seltos Old Vs NeweSakal
KIA Seltos Old Vs New
Kia Seltos Facelift vs Hyundai Creta: सेल्टॉस फेसलिफ्ट की क्रेटा, तुमच्यासाठी कोणती कार आहे बेस्ट? पाहा फीचर्स अन् किंमत

रिअर प्रोफाईल

कारच्या मागच्या बाजूला काही बदल करण्यात आले आहेत. नवीन कनेक्टेड LED टेल लॅम्पमुळे फेसलिफ्ट कारला एक मॉडर्न लुक आला आहे. नवीन बंपर आणि ड्युअल-एक्झॉस्ट टिप्समुळे आणखी स्पोर्टी लुक या कारला मिळाला आहे.

KIA Seltos Old Vs New
KIA Seltos Old Vs NeweSakal

इंटेरिअर

इंटेरिअरच्या बाबतीत नवीन फेसलिफ्ट मॉडेलमध्ये भरपूर बदल करण्यात आले आहेत. केवळ रंगसंगतीच नाही, तर डॅशबोर्डवरील फीचर्समध्येही बदल करण्यात आले आहेत. अधिकाधिक फ्युचरिस्टिक फीचर्स देण्याचा प्रयत्न नवीन सेल्टॉस फेसलिफ्टमध्ये करण्यात आला आहे. ड्युअल डिस्प्ले, टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, डिजिटल ड्रायव्हर्स डिस्प्ले असे कित्येक फीचर्स फेसलिफ्टेड सेल्टॉसमध्ये आहेत.

KIA Seltos Old Vs New
KIA Seltos Old Vs NeweSakal

सनरूफ

जुन्या सेल्टॉसमध्ये उपलब्ध नसणारं पॅनारोमिक सनरूफ नवीन सेल्टॉस फेसलिफ्टमध्ये देण्यात आलं आहे. यामुळे फीचर्सच्या बाबतीत फेसलिफ्ट ही आपल्या सेगमेंटमधील इतर सर्व एसयूव्हींना तगडी टक्कर देणार आहे.

KIA Seltos Old Vs New
KIA Seltos Old Vs NeweSakal
KIA Seltos Old Vs New
KIA Seltos Facelift: सेल्टॉसच्या फेसलिफ्ट व्हर्जनसाठी किती आहे वेटिंग पीरियड? जाणून घ्या तुमच्या शहरानुसार माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com