Gadkari Launches Toyota Innova Hycross eSakal
विज्ञान-तंत्र

Toyota Innova Hycross : नितीन गडकरींनी लाँच केली जगातील पहिली पूर्णपणे इथेनॉलवर धावणारी कार; काय आहेत फीचर्स?

Electrified Flex-Fuel : ही कार पूर्णपणे इथेनॉलवर धावेल. तसंच, ही स्वतःच वीजनिर्मिती देखील करणार आहे.

Sudesh

केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार लाँच केली. 'टोयोटो इनोव्हा हायक्रॉस' असं या गाडीचं नाव आहे. ही जगातील पहिलीच इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल कार असणार आहे. BS6 स्टेज-2 मानांकनानुसार याची निर्मिती करण्यात आली आहे.

या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे, ही पेट्रोलऐवजी पूर्णपणे इथेनॉलवर धावणार आहे. सोबतच, ही गाडी स्वतःच इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करून, EV मोडवर देखील वापरता येणार आहे. यासाठी गाडीमध्ये एक लिथियम-आयन बॅटरी पॅकही देण्यात आला आहे. ही गाडी एक प्रोटोटाईप आहे. सामान्यांसाठी ही गाडी उपलब्ध होणार आहे, की नाही याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

या गाडीचं हायब्रिड व्हर्जन सध्या भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र, हे त्याहून वेगळं असं हायक्रॉस व्हर्जन आहे. यामध्ये 2.7 लीटर फ्लेक्स-फ्युएल हायब्रिड इंजिन देण्यात आलं आहे. अर्थात, हे पूर्णपणे इथेनॉलवर काम करेल.

शेतकऱ्यांचा होणार फायदा

इथेनॉल हे इंधन ऊस, मका अशा पिकांपासून तयार होत असल्यामुळे; या इंधनाचा वापर वाढणं शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरणार आहे. सोबतच, यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होईल. देशातील 40 टक्के प्रदूषण हे गाड्यांमुळे होतं. इथेनॉलचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यास, देशातील प्रदूषण देखील कमी होईल, असं गडकरी यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लडाख आमचाच! भारताने २८ ठिकाणांची नावे जाहीर करताच चीनची आडमुठी भूमिका, नामकरणाला विरोध

दिल्लीत १५ वर्षांच्या मुलांमध्येही GI कॅन्सर! वायुप्रदूषण ठरतंय का छुपा धोका? वाचा डॉक्टर काय सांगतात

IndiGo Flight Cancellation: इंडिगोचा मोठा निर्णय! 'त्या' देशाकडे जाणारी उड्डाणे १७ ऑक्टोबरपर्यंत रद्द

Latest Marathi News Live Update: पार्थ पवार यांनी शेतकरी व सभासदांशी साधला संवाद; विजयाबद्दल मानले आभार

Manchar News : अवसरी खुर्द येथील सरकारी ओढ्यावरील अतिक्रमण हटविले; महसूल विभागाची मोठी कारवाई, शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT